शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्गाची दुरुस्ती

By admin | Updated: October 1, 2015 00:49 IST

कासारवाडीतील शंकरवाडीतील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गात नेहमीच साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनचालक आणि पादचारी वैतागले होते.

पिंपरी : कासारवाडीतील शंकरवाडीतील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गात नेहमीच साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनचालक आणि पादचारी वैतागले होते. पाणी साचू नये म्हणून एका बाजूचा कठडा तोडून वाट करून दिली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत आहे. मात्र, ही दुरुस्ती समाधानकारक नसल्याचे नागरिकांचे मत आहे. ‘भुयारी मार्गात नेहमीच सांडपाणी : वाहनचालक, पादचारी त्रस्त’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने ३ आॅगस्टला छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिकेच्या ‘क’श्रेत्रीय कार्यालयाने सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी काम नुकतेच केले. कासारवाडीहून ग्रेडसेपरेटरच्या सर्व्हिस रस्त्यावर जाण्याच्या बाजूने भुयारी पुलाजवळ भूमिगत गटारास झाकण लावले आहे. तेथून भुयारी वाहिनी टाकून नाल्यात वाट करून दिली आहे. शेजारच्या नाल्यास असलेला कॉँक्रिटचा कठडा तोडून पाण्यास वाट करून दिली आहे. गणेशोत्सवकाळात झालेल्या धुवाधार पावसाचे पाणी येथे मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. हे पाणी नाल्यात जात आहे. मात्र, ही सोय पुरेशी नसल्याने पूर्ण क्षमतेने पाणी वाहून जात नाही. भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचून राहतो. त्यामुळे दुर्गंधी कायम आहे. अशाच स्थितीत नाइलाजास्तव चालकांना ये-जा करावी लागत आहे. या तात्पुरत्या दुरुस्तीमुळे नागरिकांचे समाधान झालेले नाही. भुयारी मार्गात पाणी बिलकूल साचणार नाही, या पद्धतीने काम करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे काम करण्यात आले. मात्र, अद्याप एका बाजूने भुयारी मार्ग बंद आहे. तसेच, खोदलेल्या भूमिगत वाहिनीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले गेले नाही. नुकतीच त्यावर राडारोडा टाकून दुरुस्ती केली आहे. पावसाळ्यात ग्रेडसेपरेटरवरून येणारे पाणी उतारावरील भुयारी मार्गात साचते. गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचत असल्याने दुचाकी आणि मोटारीची ये-जा करणे गैरसोईचे ठरते. काही वाहने पाण्यात अडकून पडतात. पायीही जाता येत नसल्याने पादचारी येथून न जाता इतर मार्गांचा अवलंब करतात. बाराही महिने अशी स्थिती असल्याने नागरिक वैतागले होते. या संदर्भात वारंवार तक्रार करून महापालिका प्रशासन दखल घेत नव्हते. पाणी वाहून जाण्यासाठी असलेला मार्गच कॉँक्रिटने बंद केल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)