शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अभियंत्यावर गुन्हा दाखल करा, सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:05 IST

सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी : पोलीस आयुक्तांची घेतली भेट

पिंपरी : महापालिकेतील अभियंता अनिल राऊत यांनी शिवसेना गटनेत्याविरोधात मारहाण केल्याची तक्रार दिली. कलाटे यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल झाला असून, राऊत यांनी खंडणीची मागणी केल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी पक्षपातीपणा केला आहे. याविरोधात भाजपा, शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकजूट केली आहे. पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यावर चौकशी करूनच कार्यवाही केली जाईल, असे आयुक्तांनी शिष्टमंडळास सांगितले.

टीडीआरची फाईल मंजूर करण्यासाठी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार अभियंता अनिल राऊत यांनी केली होती. त्यानंतर कलाटे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर कर्मचारी महासंघाने केलेल्या निषेध सभेत नगरसेवकांना चोप द्यावा, असे विधान एका कर्मचाऱ्याने केले आहे. महापालिकेच्या अधिकाºयावरही दखलपात्र गुन्हे दाखल करा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे केली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, मनसे गटनेते सचिन चिखले, भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे, उत्तम केंदळे, संदीप कस्पटे, राष्टÑवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, राजू बनसोडे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, श्याम लांडे, नवनाथ जगताप, शिवसेना नगरसेवक अमित गावडे, सचिन भोसले, मीनल यादव, पौर्णिमा सोनवणे, रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे, अपक्ष नगरसेवक कैलास बारणे, नीलेश वराळे, बाबा कांबळे उपस्थित होते.४नगरसेवक जनतेचे सेवक आहेत. त्यामुळे ते जनतेची कामे करण्याची अधिकाºयांना विनंती करतात. तेच राहुल कलाटे यांनी केले. १३ फेब्रुवारी रोजी सरकारी कर्मचारी अनिल राऊत यांनी गुन्ह्याची तक्रार केली. पिंपरी पोलीस निरीक्षकांनी सहायक पोलीस आयुक्तांच्या दबावाखाली कोणतीही चौकशी न करता गुन्हा दाखल केला. त्यानंतर सर्व कर्मचारी संघाने चुकीची भाषा वापरत आंदोलन केले.४सरकारी कर्मचारी अनिल राऊत यांच्यावर संतोष कामठे गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल न करता केवळ अदखपात्र गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे नगरसेवक भीतीच्या वातावरणाखाली आहेत. त्यांना सुरक्षेची योग्य हमी द्यावी. तसेच सरकारी कर्मचारी अनिल राऊत यांच्यावर देखील दखलपात्र गुन्हा दाखल करावा, असेही म्हटले आहे.पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले, ‘‘शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केलेल्या मारहाणीच्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे दिला आहे. नगरसेवकाला चोप देण्याची भाषा करणाºयाच्या विरोधात तक्रार द्या. योग्य ती कारवाई केली जाईल.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड