शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक सेवावर्गीकरणाचा विषय आयत्या वेळी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 23:02 IST

शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे म्हणाल्या, ‘‘शिक्षक भरतीचा प्रस्ताव मंजूर करताना सत्ताधाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. भरतीच्या प्रस्तावाची फाईल सभापतींकडे कशी आली?

पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण समितीची बैठक आज झाली. त्यात १३१ पैकी ५१ शिक्षक सेवा वर्गीकरणाचा विषय आयत्या वेळी मंजूर करण्यात आला. हा विषय सर्वसाधारण सभेकडे अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. ‘‘शिक्षक भरतीमध्ये एका जागेसाठी तब्बल सात लाखांचा भाव फुटला आहे. यामध्ये साडेतीन कोटींची उलाढाल होणार असल्याचा आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादीने केला आहे. आरोपात तथ्य नसल्याचे शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांनी सांगितले.

शिक्षण समितीची सभा झाली. या वेळी भाजपाच्या शर्मिला बाबर, सुवर्णा बुर्डे, संगीता भोंडवे, शारदा सोनवणे, शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनया तापकीर, उषा काळे, राजू बनसोडे उपस्थित होते. विषयपत्रिकेवर पाच विषय होते, तर तीन विषय आयत्या वेळी मंजूर करण्यात आले. समितीच्या सभेत आयत्या वेळी सेवा वर्गीकरण, शाळानिहाय सायन्स सेंटर उभारणे, शाळांमध्ये ग्रीन बोर्ड बसविण्यासाठी रक्कम वर्गीकरणाचा विषय मंजूर करण्यात आला. सेवा वर्गीकरणाच्या विषयाला विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विरोध केला. पती-पत्नी एकत्रीकरण, एकतर्फी सेवा वर्गीकरण अशा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा महापालिका शाळेत वर्गीकरण करण्याचा विषय होता.शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे म्हणाल्या, ‘‘शिक्षक भरतीचा प्रस्ताव मंजूर करताना सत्ताधाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. भरतीच्या प्रस्तावाची फाईल सभापतींकडे कशी आली?’’ राष्ट्रवादीच्या विनया तापकीर म्हणाल्या, ‘‘हा प्रस्ताव सदस्यांमार्फत मांडला आहे. शिक्षक टप्प्याटप्प्याने वर्ग करण्याचे प्रयोजन संशयास्पद आहे. तसेच शिक्षणाधिकारी रजेवर असून, त्यांची घरी जाऊन स्वाक्षरी घेतली.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड