शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

संतपीठासाठी ‘अभ्यास’वारी

By admin | Updated: May 9, 2017 03:53 IST

संतपीठाचा आराखडा, त्यातील विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा, निवास-भोजनाची सोय, संतसाहित्य, वाङ्मयाची रचना आदींची

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : संतपीठाचा आराखडा, त्यातील विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा, निवास-भोजनाची सोय, संतसाहित्य, वाङ्मयाची रचना आदींची माहिती मिळविण्यासाठी महापालिकेतर्फे अभ्यासदौरा होणार आहे. दिल्ली, हरिद्वारपासून कटक, ओडिसापर्यंत आयोजित या विविध पीठ अभ्यासवारीत आमदार, अतिरिक्त आयुक्तांसह अनेक अभ्यासक सहभागी होणार आहेत.भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा, अन्य वारकरी संप्रदायाचे पारंपरिक शिक्षण जनमाणसांना मिळावे, म्हणून महापालिका राज्यातील पहिले जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठ टाळगाव-चिखलीत उभारणार आहे. संतपीठाला १३ मे २०१५ रोजीच्या महापालिका सभेत मान्यता दिली. त्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली चिखली येथील सर्व्हे क्रमांक १६५३ मधील १ हेक्टर ८० गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी काही अटी-शर्तींवर या जागेचा आगाऊ ताबा देण्याचा आदेश जारी केला. जमीन ताब्यात आल्यानंतर या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या संतपीठामध्ये निवासी स्वरूपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च पदवीपर्यंतचे केवळ संत साहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. या ठिकाणी वसतिगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे. येथे सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून, हे संतपीठ मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असणार आहे. समितीही नेमली असून, त्यामध्ये डॉ. सदानंद मोरे, श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थानाचे विश्वस्त अभय टिळक, हभप दिनकरशास्त्री भुकेले यांचा समावेश आहे.