शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

विद्यार्थ्यांनी अभ्यासातील आनंद शोधावा : अमित नवले

By admin | Updated: May 5, 2017 02:44 IST

ताण न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा व त्याचबरोबर अभ्यास करताना अभ्यासातील आनंद शोधावा, तसेच जेईई व नीट यांसारख्या

पिंपरी : ताण न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा व त्याचबरोबर अभ्यास करताना अभ्यासातील आनंद शोधावा, तसेच जेईई व नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी कशी करावी,या आदी विषयावर सप्तर्षी क्लासेस चे संचालक अमित नवले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लोकमत व सप्तर्षी क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स येथे हा कार्यक्रम घेण्यात  आला. अकरावी सायन्सला  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या विशेष मार्गदर्शन वगार्चे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या  सत्रात शिक्षण तज्ज्ञ विवेक वेलणकर यांनी ‘१२वी सायन्सनंतर करिअरच्या संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  विज्ञान शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंग व मेडिकल क्षेत्राकडे अनेकांचा कल असतो. त्यातही यांमधील ठरावीक शाखांचा विचार केला जातो. परंतु करिअरचे अनेक पर्याय आहेत. त्यांचाही विचार केला पाहिजे. फिजिओथेरेपी, होमिओपॅथी, स्पीच थेरपी यांसारखे पर्याय त्यांनी सुचविले. संशोधन क्षेत्राचासुद्धा करिअर म्हणून विद्यार्थ्यांनी विचार करावा, असेही त्यांनी नमूद केले. ११वी आणि १२वी या दोन वर्षांतील योग्य नियोजनावर पुढची सर्व वर्षे आणि शिक्षण अवलंबून असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे. विद्यार्थ्यांनी संख्यात्मकऐवजी गुणवत्तापूर्वक अभ्यासावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकमत आणि सप्तर्षी क्लासेस यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या वेळी स्थायी समितीचे  माजी सभापती प्रशांत शितोळे  यांनीही आपले मनोगत व्यक्त  केले. या कार्यशाळेसाठी सप्तर्षी क्लासेस या संस्थेने पुढाकार घेतला. तसेच कार्यक्रमाचे स्थळ प्रायोजक म्हणून सिझन ग्रुप सोशल वेल्फेअर ट्रस्ट होते. (प्रतिनिधी)मार्गदर्शन वर्गाच्या दुसऱ्या सत्रात सप्तर्षी क्लासेसचे संचालक अमित नवले यांनी जेईई व नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांंबद्दल माहिती दिली. या प्रवेश परीक्षांची तयारी कशी करावी,या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मेडिकल व इंजिनिअरिंगसाठी कोणत्या प्रवेश परीक्षा आहेत. त्यांचे स्वरूप कशा प्रकारचे आहे. परीक्षांची तयारी कशी करावी, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.