शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश ; विविध पदांची भरती बंद केल्याच्या विरोधात मोर्चा

By admin | Updated: October 17, 2016 18:30 IST

राज्य शासनाने विविध विभागातील 90 हजार जागा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १७ : राज्य शासनाने विविध विभागातील 90 हजार जागा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरातीच काढल्या गेल्या नाहीत.परिणामी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एमपीएससी स्टुडेंटस् राईटच्या माध्यमातून 400 हून अधिक अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी सोमवारी शनिवारवाडा ते विधानभवन दरम्यान मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.राज्य शासनाने नोकर भरती वरील कपात त्वरीत उठवावी, राज्यसेवा,विक्रीकर निरीक्षक, वनसेवा यांच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात.

शासनाच्या कंत्राटी पध्दतीने भरल्या जाणार व सध्या भरण्यात आलेल्या सर्व जागा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भराव्यात. पीएसआय पदाची 2 वर्षे न काढलेली जाहिरात त्वरीत काढावी.1998 पासून बंद झालेली एक्साईस इन्सपेक्टर पदाची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. कृषी सेवकाच्या परीक्षेमध्ये झालेल्या भष्टाचाराची चौकशी करून त्यावर कार्यवाही करावी,आदी प्रमुख मागण्यांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभागी होऊन आपला आक्रोश व्यक्त केला.

आमचा मोर्चा राज्य शासनाच्या विरोधात नाही तर विविध पदांच्या भरतीविषयी शासनाने स्वीकरलेल्या धोरणाविरोधत आहे,असे मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तब्बल 25 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रोफाईल तयार झाले आहे. मात्र, त्यातुलनेत विविध पदांची भरती करण्यासाठी एमपीएससीकडून जाहीराती काढल्या जात नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. पूनम डोके,कुमुदिनी पातोडे, राणी डफळ, प्रियदर्शनी पाटील आदी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिका-यांशी संवाद साधला.