शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीला मिळाले जीवनदान

By admin | Updated: December 27, 2016 03:13 IST

महापालिका शाळेत शिकणाऱ्या गरीब घरातील विद्यार्थिनीची हृदय शस्त्रक्रिया पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना आणि वर्गशिक्षिकेच्या प्रयत्नामुळे मोफत करणे शक्य झाले.

पिंपरी : महापालिका शाळेत शिकणाऱ्या गरीब घरातील विद्यार्थिनीची हृदय शस्त्रक्रिया पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना आणि वर्गशिक्षिकेच्या प्रयत्नामुळे मोफत करणे शक्य झाले.चिंचवड स्टेशन येथील महापालिकेच्या कन्याशाळेतील इयत्ता पाचवी अच्या वर्गशिक्षिका सविता गावडे यांना विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीच्या वेळी वैष्णवी धोत्रे या विद्यार्थ्यांच्या हृदयास होल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी शस्त्रक्रिया लवकरात लवकर करण्याचा सल्ला देताना डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी साधारण दीड लाख रु. खर्च येणार असल्याचे सांगितले. वैष्णवी ही इंदिरानगर चिंचवड स्टेशन झोपडपट्टीत राहते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. आई अशिक्षित व धुण्या-भांड्याची कामं करते. अशात गावडे यांनी वैष्णवीच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील डॉ. प्रवीण जाधवर, पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज मराठे, तानाजी कुकनर , विजया सोनटक्के यांच्या सहकार्याने हृदयशस्त्रक्रियेसाठी असलेल्या विविध शासकीय योजना- प्रधानमंत्री योजना, राजीव गांधी योजना व निधी उपलब्ध करून देणाऱ्या विविध ट्रस्ट-शिर्डी साईबाबा ट्रस्ट, एलआयसी ट्रस्ट, महापौर फंड, हॉस्पिटलची माहिती घेतली. पदवीधर शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षिका गावडे यांच्या प्रयत्नामुळे वैष्णवीला एक प्रकारे जीवनदान मिळाले आहे. (प्रतिनिधी)- सविता गावडे यांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव केली. स्वत: तहसील कार्यालयात जाऊन वैष्णवीच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला मिळवला. सातत्याने वैष्णवीच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटल, डॉक्टरांशी संपर्क ठेवला. वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने व हॉस्पिटल आवश्यक तो प्रतिसाद देत नसल्याने वैष्णवीच्या शस्त्रक्रियेसाठी मराठे व गावडे भांडलेही. अखेर कोरेगाव पार्क पुणे येथील बुधरानी हॉस्पिटलमध्ये १७ डिसेंबर रोजी वैष्णवीच्या हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.