शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अनधिकृत फ्लेक्सबाजीला बसणार चाप, सार्वजनिक ठिकाणी अवैध फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 02:09 IST

शहरातील महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्यात येणार असून, मालमत्ता, सार्वजनिक ठिकाणी अवैध जाहिरातफलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी धोरण ठरविले आहे.

पिंपरी - शहरातील महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्यात येणार असून, मालमत्ता, सार्वजनिक ठिकाणी अवैध जाहिरातफलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी धोरण ठरविले आहे. त्यानुसार अशा जाहिरातधारकांना ७५० रुपये प्रतिचौरस मीटर इतका दंड आकारण्यात येणार आहे.स्थायी समिती सभेने आयत्या वेळी मंजुरी दिली.महापालिकेकडून सार्वजनिक जागा, रस्त्यांवर, चौकाचौकांत लावण्यात येणारे फ्लेक्स, भित्तिपत्रकाद्वारे कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यास परवानगी दिली जात नाही. अशा प्रकारच्या जाहिरात फ्लेक्सवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते. महापालिकेच्या मालमत्तांवर बºयाच ठिकाणी हँडबिल, कागदी भित्तिपत्रके लावली जातात. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होते. अशा प्रकारच्या अवैध जाहिरातदारांना आळा घालण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण येण्यासाठी कारवाई करण्याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाला सूचना दिल्या आहेत. महापालिका मालमत्तांवर चिकटविलेले किंवा उभारलेले भित्तिपत्रके, फ्लेक्स काढण्याची कारवाई करणे आणि जागा पूर्ववत करणे यासाठी खर्चाचे अंदाजपत्रक स्थापत्य विभागाकडून पत्राद्वारे मागविले होते. या कामासाठी त्यांनी ३७५ रुपये प्रतिचौरस मीटर इतका दर कळविला आहे. परंतु, हा दर फक्त अवैध जाहिरातफलक काढणे आणि जागा पूर्ववत करणे याकरिता आहे. ज्या व्यक्तीने किंवा जाहिरातदाराने जाहिरात लावली आहे. त्यांनाही ३७५ रुपये प्रतिचौरस मीटर दराने दंड आकारावा. एकूण ७५० रुपये प्रति चौरस मीटर इतका दंड आकारण्यात यावा. अशा प्रकारच्या कारवाईसाठी २०१३ मध्ये आरोग्य निरीक्षकांना अधिकार प्रदान केले आहेत.सर्वसाधारण सभेत प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठीदंडात्मक शुल्क किती आकारावे, रक्कम निश्चित करण्यासाठी धोरण ठरविले आहे. त्यानुसार या धोरणाची अंमलबजावणी करताना संबंधितांना पहिल्यांदा नोटीस देऊन जाहिरातफलक काढण्यास आणि जागा पूर्ववत करण्यास बजावण्यात येणार आहे. नोटीस कालावधीत जाहिरात काढून न घेतल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार महापालिका मालमत्तांवर आणि सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे जाहिरात फलक लावणाºया जाहिरातधारकांना ७५० रुपये प्रतिचौरस मीटर इतका दंड आकारण्यात येणार आहे. हा विषय महापालिका सभेसमोर ठेवण्यास स्थायी समिती सभेने आयत्या वेळी मंजुरी दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या