शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात दगड घालून खून

By admin | Updated: April 26, 2017 03:50 IST

रायवूड पार्क कॉलनी लोणावळा येथे राहणारे अनिरुद्ध नालकर (वय ४८, मूळ राहणार जालना. सध्या राहणार रायवूड पार्क लोणावळा) हे सोमवारी रात्री

लोणावळा : रायवूड पार्क कॉलनी लोणावळा येथे राहणारे अनिरुद्ध नालकर (वय ४८, मूळ राहणार जालना. सध्या राहणार रायवूड पार्क लोणावळा) हे सोमवारी रात्री आरोपी यांच्या पत्नीशी बोलत बसले होते. हा राग मनात धरत व बायकोवर संशय घेत आरोपी राजू राघू सदावर्ते (वय ३५, मूळ राहणार सावरगाव भागडे, पो. शेवली, जि. जालना. सध्या राहणार रायवूड पार्क कॉलनी लोणावळा) याने अनिरुद्ध हे झोपेत असताना मध्यरात्री त्यांच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी घणाने घाव घालत त्यांचा खून करून पलायन केले. घटनेची माहिती समजताच अवघ्या दोन तासांत लोणावळा शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत अटक केली. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील काही कामगार रायवूड पार्क येथे राहतात. मयत अनिरुद्ध व आरोपी राजू सदावर्ते हे एकाच गावातील असून रायवूड पार्क कॉलनी येथे शेजारीच राहतात. मयत अनिरुद्ध व आरोपी याची पत्नी रात्री गप्पा मारत बसले होते. याचा राग मनात धरत व स्वत:च्या पत्नीवर संशय घेत मध्यरात्री आरोपी राजू याने दारूच्या नशेत अनिरुद्ध याच्या डोक्यात लोखंडी घणाने घाव घालत त्याचा खून केला. घटनेची माहिती समजताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व लोणावळा शहरच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने आरोपीला अटक केली. (वार्ताहर)