शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना अटक

By admin | Updated: March 23, 2016 00:56 IST

तीन दिवसांपूर्वी चिंचवडमधील मोहननगर येथील मोबाइल विक्रीचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे

चिंचवड : तीन दिवसांपूर्वी चिंचवडमधील मोहननगर येथील मोबाइल विक्रीचे दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहबाज ऊर्फ मोठा रावण ताज शेख (वय १९, रा. रेल्वे फाटकजवळ, कासारवाडी), तालीफ ऊर्फ मिर्ची वली शेख (वय १९, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी), लखन चंद्रकांत परहर (वय २१, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी), किरण ऊर्फ दाद्या गौतम शिंदे (वय १९, रा. गांधीनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. १८) च्या रात्री फिर्यादी योगेश कोठावदे यांच्या मोहननगर येथील मोबाइल विक्रीच्या दुकानाचे चोरट्यांनी शटर उचकटले व दुकानातून विविध कंपन्यांचे ३२ मोबाइल, रिचार्ज व्हाऊचर, चार्जर असा एकूण १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. पिंपरी पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना मोबाइलचे दुकान फोडणारे चोरटे हे पिंपरीतील एका कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानामध्ये बसले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सहायक पोलीस निरीक्षक बुधकर, पोलीस उपनिरीक्षक हरीष माने हे घटनास्थळी गेल्यावर पोलिसांना पाहून चोरट्यांनी पळ काढला. मात्र, चोरट्यांना शिताफीने पकडून ताब्यात घेतले असता, त्यांनी चोरीचा गुन्हा कबूल केला. या आरोपींमध्ये किरण शिंदे व शहबाज शेख हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. चोरट्यांना मंगळवारी (दि. २२) न्यायालयात हजर केले असता शुक्रवार (दि. २५) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई परिमंडळ तीनचे पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली. (वार्ताहर)