शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थायी’चे कारभारी आज बदलणार, भाजपातून ६०; राष्ट्रवादीतून २० इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 07:08 IST

भाजपाच्या दहा जागांसाठी साठ जण इच्छुक आहेत. दहा जणांची निवड केली जात असताना, नदीपलीकडचा आणि अलीकडचा हा निकष लावला जाणार आहे.

पिंपरी : स्थायी समितीचे आठ सदस्य मुदत संपल्याने चिठ्ठीद्वारे बाहेर पडले. त्यात भाजपाचे सहाजण बाहेर पडले; मात्र भाजपाने उर्वरित चार जणांचेही राजीनामे घेतले. चिठ्ठीद्वारे राष्ट्रवादीचे दोन बाहेर पडले. त्यामुळे स्थायी समितीच्या १६ पैकी १२ नवीन सदस्यांची निवड मंगळवारी होणाºया सर्वसाधारण सभेत होणार आहे. महापालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या समितीच्या सदस्यपदी कोणाला संधी मिळणार याबद्दलची उत्सुकता आहे.स्थायी समिती सदस्यपदावर दर वर्षी नव्यांना संधी देण्याचे धोरण भाजपाने अवलंबले आहे. भाजपा तसेच राष्टÑवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. समितीवर आपली वर्णी लागण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. राष्टÑवादी काँग्रेसकडे जागा दोन पण इच्छुकांची संख्या दहापट आहे. भाजपाच्या दहा जागांसाठी साठ जण इच्छुक आहेत. स्थायी समितीवर संधी मिळावी यासाठी भाजपाच्या नगरसेवकांची धावपळ सुरू आहे.स्थायी समितीवर पाच वर्षांत ५० जणांना संधी मिळणार हे भाजपाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.भाजपातून ६०; राष्ट्रवादीतून २० इच्छुकभाजपाच्या दहा जागांसाठी साठ जण इच्छुक आहेत. दहा जणांची निवड केली जात असताना, नदीपलीकडचा आणि अलीकडचा हा निकष लावला जाणार आहे. आमदार लांडगे समर्थक आणि आमदार जगताप समर्थक यांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न होणार आहे. शिवाय जुने-नवे, निष्ठावंत-आयात या निकषांचाही आधार घेतला जाणार आहे. राष्टÑवादी काँग्रेसमध्ये दोन जागांसाठी सुमारे २० जण इच्छुक आहेत. त्यांच्यातही रस्सीखेच आहे. मात्र त्यांचा सदस्य निवडीचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेतला जाण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीवर सदस्यपद मिळविण्यात कोण बाजी मारणार, हे मंगळवारी दुपारी स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड