शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

उसळली गर्दी, उत्साह शिगेला

By admin | Updated: April 15, 2016 03:44 IST

देशाचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नममस्तक होऊन पुष्पहार अर्पण करण्यासाठी उसळलेली गर्दी, पुतळा परिसरात सुरू असलेले प्रबोधनात्मक कार्यक्रम

पिंपरी : देशाचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नममस्तक होऊन पुष्पहार अर्पण करण्यासाठी उसळलेली गर्दी, पुतळा परिसरात सुरू असलेले प्रबोधनात्मक कार्यक्रम यामुळे पिंपरी चौकातील पुतळा परिसराचे स्वरूप पालटून गेले. दरवर्षी डॉ.आंबेडकर जयंतीला पुतळ्याजवळ गर्दी होत असते. जयंतीचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने यंदा मात्र गर्दीने उच्चांक गाठला. उसळलेली गर्दी अन् उत्साह शिगेला, अशी स्थिती पाहावयास मिळाली.जयंतीदिनी पहाटेपासूनच विहारांमध्ये बुद्ध वंदनेचे सूर निनादले. ठिकठिकाणी त्रिशरण पंचशीलेचे पठण झाले. विहारांवर सकाळपासूनच पंचशील ध्वज डौलाने फडकले. कपाळाला निळी पट्टी बांधून, जयभीमचा नारा देणारे युवक, बौद्ध उपासिका, उपासक, समता सैनिक दलाचे जवान यांची सर्वत्र सुरू असलेली जयंतीची धामधूम यांमुळे अवघा परिसर दणाणून गेला.देशाचे भाग्यविधाते ठरलेल्या महामानवाच्या चरणी लीन होण्यासाठी समाजातील विविध स्तरांतील नागरिक उपस्थित होते. पददलित, शोषित, पीडितांचे उद्धारक ठरलेल्या या महामानवाप्रती सव्वाशे वर्षांनंतरही कृतज्ञता व्यक्त होत आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांच्याबद्दलचे प्रेम,आपुलकी तसूभरही कमी झाली नसल्याने दिवसेंदिवस जयंती सोहळ्याचे स्वरूप वाढत असल्याचा प्रत्यय पिंपरीत उसळलेल्या गर्दीने आला. शहराच्या विविध भागांतून येणारे लोंढे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दाखल होत होते. जयंतीच्या आदल्या दिवशीच रात्री १२ वाजल्यापासून नागरिक सहकुटुंब पुतळ्याजवळ येत होते. तेव्हा सुरू झालेली रिघ जयंतीदिनी रात्री उशिरापर्यंत अखंड राहिली. परिसरात परिवर्तनवादी पुस्तके, बुद्धमूर्ती, बुद्ध,भीमगीतांच्या ध्वनिफिती विक्रीस होत्या. खरेदीसाठी झुंबड उडाली होती. डॉ. आंबेडकर,महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजीमहाराज या राष्ट्रपुरुषांच्या चरित्रग्रंथांना मागणी होती.(प्रतिनिधी)लोकाभिमुख उपक्रमसमाजातील गरीब,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी, या हेतूने स्थापन केलेल्या समितीने वह्या व पेन संकलनाचे काम केले. अभिवादनासाठी येणाऱ्यांनी समितीकडे वह्या,पेन जमा केले. या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. जमा झालेल्या वह्या, पेन गरीब, गरजू विद्यार्थ्यांपर्यत पोहोचविण्यात येणार आहे. नगरसेवक कैलास कदम, सद्गुरू कदम यांच्या पुढाकाराने रुग्णवाहिका अर्पण कार्यक्रम घेण्यात आला. विविध संस्थांनी अन्नदान केले. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी सलग १८ तास वाचन असेही अनोखे उपक्रम जयंतीनिमित्त घेण्यात आले.