शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

स्थायी समिती सदस्य : पालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 03:11 IST

लष्कराकडून बोपखेल पुलाबाबत महिन्यापूर्वी पत्र येऊनही कार्यवाही न झाल्याने स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले. असंवेदनशील प्रशासनामुळेच पुलाच्या कामाला खोडा बसल्याची टीका सदस्यांनी केली. स्थायी समितीसमोर आलेल्या ऐनवेळेसचा प्रस्ताव मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे.

पिंपरी : लष्कराकडून बोपखेल पुलाबाबत महिन्यापूर्वी पत्र येऊनही कार्यवाही न झाल्याने स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले. असंवेदनशील प्रशासनामुळेच पुलाच्या कामाला खोडा बसल्याची टीका सदस्यांनी केली. स्थायी समितीसमोर आलेल्या ऐनवेळेसचा प्रस्ताव मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे.पिंपरी-चिंचवड आणि पुणे, खडकीच्या सीमेवर बोपखेल हे गाव आहे. या गावाच्या तिन्ही बाजूंनी लष्कराची हद्द आहे. पूर्वी या गावात जाण्यासाठी दापोडीतील सीएमई हद्दीतून जावे लागत होते. मात्र, संरक्षणाच्या मुद्द्यावरून या जागेतून जाण्यास लष्कराने मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांना वळसा घालावा लागत होता. दोन वर्षांपूर्वीच मंजूर सीएमई हद्दीतून परवानगी नाकारण्यात आल्याने बोपखेल ते खडकी असा पूल उभारण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात ४२ कोटी खर्चून पूल उभारण्याचा विषय मंजूरही केला होता. त्यानंतर पूल उभारण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. डिफेन्स इस्टेट आॅफिस पुणे सर्कलने महापालिकेला पत्रही पाठविले आहे.महापालिकेने पुलाची जागा हस्तांतरणासाठी मागितल्यानंतर आणि पूल उभारण्यास संमती मिळाल्यानंतर जागेचा मोबदला मिळावा यासाठी डिफेन्स इस्टेट पुणे सर्कल विभागाचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले. साधारणपणे २३ हजार ८४२ चौरस मीटर जागा अपेक्षित असून, त्यासाठी २२ कोटी २४ लाखांची मागणी डिफेन्स इस्टेटने केली आहे. हे पत्र ३० जानेवारीला पाठविले असून पीडीडीईच्या २१ डिसेंबरच्या पत्राचा संदर्भ त्यावर दिला आहे. हे पत्र मिळून पाच महिने झाले. जागेची रक्कम कमी करण्यासंदर्भात महापालिकेने ३० जानेवारीला पुन्हा संरक्षण खात्यास पत्र दिले आहे. प्रशासनाचा पुलाला खोडा असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात प्रकाशित केले होते. यावर आजच्या स्थायी समितीत चर्चा झाली.बोपखेलवासीयांचा मोठा प्रश्न असताना प्रशासन असंवेदनशील आहे. तातडीचे असा उल्लेख पत्रावर असताना महिन्यापूर्वी पत्र येऊनही उत्तर दिले गेले नाही. डेअरी फार्मबाबत जेवढी संवेदनशीलता दाखविली तेवढी बोपखेलबद्दल दाखविली नाही, नगरसेवक विकास डोळस यांनी नाराजी व्यक्त केली.२५ कोटींचा द्यावा लागणार मोबदला४पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलाच्या जागेसाठी संरक्षण खात्याने २५ कोटीचा मोबदला मागितला आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ऐनवेळी स्थायीसमोर ठेवण्यात ठेवला होता. त्यास मंजुरी दिली आहे, असे विलास मडिगेरी यांनी सांगितले. बोपखेलचा पूल लवकरात लवकर होण्यासाठी महापालिका प्रशासनाने लवकर हालचाली करणे गरजेचे आहे. स्थायी समितीने हा प्रस्ताव महासभेकडे पाठविला आहे. त्यामुळे बोपखेलचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून, बोपखेलकरांची त्रासापासून मुक्तता होणार आहे, असे चेतन घुले यांनी सांगितले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या