शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मगर स्टेडिअम भाडे तत्त्वावर देण्यास विरोध

By admin | Updated: February 7, 2016 03:40 IST

महापालिकेचे नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअम खासगी क्रीडा संस्थेस भाडेतत्त्वावर देण्याचा सुरू असलेल्या प्रयत्नाचा शहरातील क्रीडाप्रेमींनी निषेध केला आहे.

पिंपरी : महापालिकेचे नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअम खासगी क्रीडा संस्थेस भाडेतत्त्वावर देण्याचा सुरू असलेल्या प्रयत्नाचा शहरातील क्रीडाप्रेमींनी निषेध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत स्टेडिअमचे खासगीकरण करू नये, अशी मागणी क्रीडा क्षेत्रातून होत आहे. ‘अण्णासाहेब मगर स्टेडिअम मैदान खासगी संस्थेला देण्याचा घाट’ या मथळ्याखाळी ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध केले. खेळापेक्षा महापालिकेचे उत्पन्नावर वाढीवर असलेला नीतीचा क्रीडा क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. संबंधित प्रतिनिधी आणि कार्यालयात संपर्क साधत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केला. व्हॉट्स अ‍ॅप गु्रपवर ही बातमी दिवसभर फिरत होती. वेगवेगळ्या क्रीडा संघटना, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षकांनी या धोरणाचा निषेध केला आहे. यामुळे मगर स्टेडिअम खासगी संस्थेस भाडेतत्त्वावर देऊ नये, अशी आग्रही मागणी पिंपरी-चिंचवड स्पोटर््स गु्रपतर्फे महापौर शकुंतला धराडे व आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे. या वेळी पिंपरी-चिंचवड स्पोटर््स गु्रपचे प्रमुख रोहित खर्गे, पिंपरी-चिंचवड शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष निवृत्ती काळभोर, कुस्ती संघटक गुलाब सोनवणे, एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले, शरीरसौष्ठव क्लबचे प्रणव मुजुमदार, कबड्डी प्रशिक्षक दिनेश देशमुख, सॉफ्टबॉल संघटनेच्या अध्यक्षा मृदुला महाजन, सुनीता फडके, शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव राजेश सावंत, क्रीडा शिक्षक अनिल दाहोत्रे, प्रशिक्षक संतोष म्हात्रे, धोंडिबा रासणे, भाऊसाहेब जाधव, संजय महाडिक, सचिन साठे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)उद्योगनगरीने क्रीडा क्षेत्रात नावलौकिकमिळविला आहे. बहुतांश खेळाडू हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. महापालिकेकडून असा खेळाडूंना सुविधा दिल्या गेल्या नाही, तर खेळाडूंची प्रगती खुंटणार आहे. मुळातच शहरातील विविध शाळांमध्ये मैदाने नाहीत. वाढती लोकसंख्या पाहता मैदानाची संख्या अल्प आहे. अशा स्थितीत विद्यार्थी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. उलट, क्रीडांगण खासगी संस्थांना चालविण्यास देण्याचा घाट घातला जात आहे. असे केले तर खेळाडू सराव कोठे करणार, नवोदित खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिक यांनी आपल्या तंदुरुस्ती आणि स्पर्धेसाठी कोठे जायचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. खासगी संस्थांचे शुल्क सर्वसामान्यांना परवडणार नाही.