शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

By admin | Updated: August 10, 2015 02:49 IST

‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात मासिक सभा घेऊन त्याचा फायदा काय? या सभेत झालेल्या ठरावावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसेल,

रहाटणी : ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात मासिक सभा घेऊन त्याचा फायदा काय? या सभेत झालेल्या ठरावावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसेल, तर सभा घ्यायची कशाला? संबंधित विभागाचे अधिकारीच उपस्थित राहत नसतील, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आयुक्तांना निवेदन द्यावे लागेल. काही अधिकारी सभेत फक्त ऐकून घेण्याचे काम करतात. मात्र, झालेल्या ठरावावर अंमलबजावणी करीत नाहीत, असा संतप्त सवाल सर्वपक्षीय नगरसेवकांनी मासिक सभेमध्ये उपस्थित केला. प्रभागातील रखडलेली कामे, मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, अनेक समस्या सोडविण्यासाठी अधिकारी कामचुकारपणा करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत नगरसेवकांनी अनेक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सध्या शहरात अनधिकृत बांधकामाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, पालिका प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. अनेक नागरिक नळजोडणीसाठी अर्ज करीत आहेत. मात्र, तांत्रिक अडचणी पुढे करून अर्जावर कोणतीही कारवाई न करता तसेच ठेवले जात आहे. मात्र, नागरिक विनापरवाना नळजोडणी करीत आहेत. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. अधिकारी यावर कोणतीही उपाययोजना करीत नसल्याचा सवाल नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी उपस्थित केला. सध्या संध्याकाळी पालिकेच्या विद्युत विभागाचे कर्मचारी रात्री ८ वाजेपर्यंत कामावर असतात. जर त्यानंतर एखादी अडचण निर्माण झाली, तर तक्रार कोणाकडे करणार, की नागरिकांनी रात्रभर अंधारात राहायचे? असा सवाल नगरसेवक कैलास थोपटे यांनी उपस्थित केला. घरोघरी जाऊन कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांची अरेरावी, कुत्र्यांचा उच्छाद असा एक ना अनेक तक्रारींचा पाढा नगरसेवकांनी वाचला. (वार्ताहर)