शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मतपेटीसाठी सामान्यांच्या जिवाशी खेळ, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 06:05 IST

शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणावर तोडगा निघाला. शास्तीकर माफीचा निर्णय झाला. तरीही शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरूच आहेत.

पिंपरी : शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणावर तोडगा निघाला. शास्तीकर माफीचा निर्णय झाला. तरीही शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरूच आहेत. महापालिका, नवनगर विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमणविरोधी पथकामार्फत अनधिकृतबांधकामे पाडली जात आहेत. डोळ्यांदेखत अनधिकृत बांधकामे भुईसपाट होत असल्याचे पाहूनही पिंपरी-चिंचवडमधील नागरिक कसलीही पर्वा न करता, राजकीय पाठबळावर विनापरवाना बांधकामे करण्यात व्यस्त आहेत.नुकताच शास्तीकर माफीचा निर्णयसुद्धा झाला. अवैध बांधकामांना अभय देण्यात आणि नागरिकांची घरे वाचविण्यात राजकीय नेत्यांना यश आले. या राजकीय नेत्यांचे सध्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे लक्ष का जात नाही, की त्यांनी मतपेटीच्या राजकारणास्तव त्याकडे जाणीवपूर्वक काणाडोळा केला आहे, असा संतप्त सवाल सुजाण नागरिक उपस्थित करू लागले आहेत.पिंपरी-चिंचवड हे झपाट्याने विकसित झालेले शहर असले, तरी या शहरात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झाल्याचा राज्यभर बोभाटा आहे. फेब्रुवारी २०११ ला अनधिकृत बांधकामांसंबंधी दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले. तेव्हापासून महापालिकेने विविध प्रकारे अनधिकृत बांधकामे रोखण्याचा विविध प्रकारे प्रयत्न केला. तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. त्या कालावधीत तीन वर्षांत सुमारे आठ लाखांहून अधिक अनधिकृत बांधकामे महापालिकेने भुईसपाट केली. चार मजल्यांच्या इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. पत्राशेड पाडली. नदीकाठच्या बांधकामांवर कारवाई झाली. अनधिकृत बांधकामे करणाऱ्या मिळकतधारकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले. अपुरे मनुष्यबळ, पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळण्यात अडचणी येत असल्याची सबब पुढे करून प्रशासनाने कारवाईबाबत काणाडोळा केला.मुंबईचे तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून शासनाला अहवाल सादर करण्यात आला. विशिष्ट दंड आकारून २०१५ नंतरची बांधकामे नियमित करता येतील, असा दिलासादायक निर्णय झाला. २००८ नंतरच्या अनधिकृत बांधकामांना शासनाने दुप्पट शास्तीकर लावला. अवैध मिळकतधारकांनी शासन निर्णयाची प्रतीक्षा करीत शास्तीकर भरला नाही. एवढेच नव्हे, तर बहुतांश मिळकतधारकांनी मिळकतकरसुद्धा थकविला आहे.नियमांचे पालन करणाºयांची कोंडीशेजारी राजरोसपणे अवैध बांधकामे करणारे नियम पाळून बांधकामे करणाºयांपुढे अडचणी निर्माण करतात. दोन इमारतींच्या मध्ये हवा खेळती राहणार नाही, ये-जा करणाºयांना जागा पुरेशी उपलब्ध नाही. अशा समस्या अवैध बांधकामे करणाºयांनी निर्माण केल्या आहेत. ज्यांनी रीतसर परवानगी घेऊन, नियमात बांधकामे केली आहेत, त्यांची कोंडी होऊ लागली आहे. शेजारच्याची तक्रार करायची, तर कायमस्वरूपी शत्रुत्व ओढवून घ्यावे लागेल. ही भीती मनात बाळगून ते तक्रार करण्यासही धजावत नाहीत.- महापालिका अधिकाºयांकडे तक्रार केली, तर कोणातरी पुढाºयाचा अवैध बांधकाम करणाºयावर वरदहस्त असल्याचे लक्षात येते. अवैध बांधकामांना कठोर कारवाईने आळा बसण्याची शक्यता धूसर झाली आहे. नागरिकांच्या मानसिकतेत बदल घडून आला तरच आळा बसू शकेल, अशी हतबलता शहरातील सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड