शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

सोने खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: May 10, 2016 00:33 IST

शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचे महत्त्व आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा शुभमुहूर्त. या मुहूर्ताचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी केली.

पिंपरी : शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचे महत्त्व आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा शुभमुहूर्त. या मुहूर्ताचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी केली.बंदमुळे गुरुपुष्यामृत, पाडवा अशा विविध मुहूर्तांवर ग्राहकांना सोनेखरेदी करता आली नाही. त्याचा फटका सराफांनाही बसला होता. त्यामुळे ४२ दिवसांच्या बंदनंतर सराफांची दुकाने १० दिवसांपासून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तासाठी सज्ज झाली. दुकाने सुरू झाल्यानंतर सोनेखरेदीचा पहिलाच मुहूर्त आल्यामुळे दुकानांमध्ये जोरदार तयारी सुरू झाली. वेगवेगळ्या कलाकृतीचे सोन्याचे दागिने व्यावसायिकांकडून विक्रीस आणले गेले. काही सराफांकडून दागिन्यांच्या घडणावळीवर सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्यात आले. सोमवारी सकाळी दहा पासूनच बाजारपेठेत सोनेखरेदीसाठी गर्दी होती. वेगवेगळे ब्रँड व आॅनलाइन बाजारपेठही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असली, तरी अजूनही पारंपरिक सराफांकडून सोनेखरेदीकडे लोकांचा कल आहे. नेहमीच्या सुवर्णकाराचे दुकान बंद असल्यामुळे लोकांनी काही दिवस सोने खरेदी केले नाही. मे महिन्यात या वर्षी लग्नाचे मुहूर्त नाहीत. परंतु जून व जुलै महिन्यातील लग्नाच्या मुहूर्तासाठी लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोने खरेदी केले. काहींनी सराफ व्यावसायिकांचा बंद मागे झाल्यावरच अक्षय्य तृतीयेला मिळतील असे नियोजन करून दागिन्यांचे आगाऊ बुकिंग करून ठेवले होते. सोन्याचा भाव २४ कॅरेटसाठी ३० हजार, तर २३ कॅरेटच्या दागिन्यांसाठी २९५०० रुपये इतका होता. चांदीचा भाव ४२ हजार रुपये किलोइतका होता. (प्रतिनिधी)