शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

देशासाठी रोज केवळ दहा मिनिटे खर्च करा

By admin | Updated: February 6, 2017 06:07 IST

प्रत्येक देशवासीयाने देशासाठी रोज केवळ दहा मिनिटे खर्च केली तर मानवी शक्तीचा प्रचंड स्रोत निर्माण होवून देश प्रगती पथावर जाऊ शकतो

वाकड : प्रत्येक देशवासीयाने देशासाठी रोज केवळ दहा मिनिटे खर्च केली तर मानवी शक्तीचा प्रचंड स्रोत निर्माण होवून देश प्रगती पथावर जाऊ शकतो. त्यामुळे दैनंदिन धावपळीच्या या जगातून देश आणि समाजहिता साठी नक्की वेळ काढा, असे आवाहन जेष्ठ शास्त्रज्ञ इस्रो संस्थेचे माजी मुख्य संचालक पद्मश्री डॉ. प्रमोद काळे यांनी वाकड येथे केले. लायन्स क्लब चिंचवड रॉयल आयोजित लायन्स क्लब आॅफ वाकडची स्थापना येथील क्लब २९ च्या सभागृहात करीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. ते म्हणाले, आपण स्वत:चे उपग्रह अवकाशात सोडले आहेत. त्यामुळे आपल्या बरोबरच संपूर्ण जगात शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडली आहे. तसेच उपग्रहांद्वारे होणाऱ्या दळण-वळणामुळे, शिक्षण क्षेत्रात घडून आलेल्या क्रांतीचा त्यांनी सम्यक आढावा घेतला. या नूतन क्लबच्या सेवा कार्याची सुरुवात दहशतवाद्यांच्या पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेल्या जामखेड येथील वीर पुत्र नितीन दगडू जगताप यांच्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी २१ हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नी रोहिणी यांच्याकडे सुपूर्त करीत सुरुवात करण्यात आली. क्लबच्या नवनियुक्त अध्यक्षा सुगंधा जोहर, आणि त्यांच्या टीमला सेवा व्रताची शपथ पूर्व गव्हर्नर श्रीकांत सोनी यांनी दिली. तर डिस्ट्रिक गव्हर्नर चंद्रहास शेट्टी यांनी चार्टर प्रदान केले. अरुण देशमुख यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर सैनिकांसाठी विस्फोट ही मराठवाड्याच्या भाषा शैलीतील कविता सादर केली. डॉ. अनिल परांजपे यांनी शैक्षणिक क्षेत्रात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमासाठी मोहन कलाटे यांनी सहकार्य केले. तर सूत्रसंचालन स्वाती कोरडे व डॉ. स्वप्नाली धोका यांनी केले. (वार्ताहर)