शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

भोसरीतील गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रियेला गती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 17:20 IST

भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये शासकीय गायरान एकूण १६ आहेत. त्यांचे क्षेत्र एकूण २०९ हेक्टर असून, ही सर्व जमीन जिल्हाधिकारी यांच्या मालकीची आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांची सकारात्मक भूमिका जागेची देखभाल करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे जागा हस्तांतरण करण्याची गरज गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रियेबाबत मी स्वत: लक्ष घालून राज्य शासनाकडे पाठपुरावा करणारसंबंधित जागांवरील आरक्षण विकसित करण्याचा मार्ग मोकळा होणार

पिंपरी- भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत गायरान जमीन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळाली आहे.  एकूण १६ गायरानपैकी ४ जमिनींचे हस्तांतरण झाले असून, लवकरच अन्य जमिनींची हस्तांतरण प्रक्रिया मार्गी लागेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत बैठक होति. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, नगर रचना विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर, भूमि अभिलेख उपअधिक्षक शिवाजी भोसले, आदी अधिकारी उपस्थित होते.भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये शासकीय गायरान एकूण १६ आहेत. त्यांचे क्षेत्र एकूण २०९ हेक्टर असून, ही सर्व जमीन जिल्हाधिकारी यांच्या मालकीची आहे. त्या जागेची देखभाल करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे जागा हस्तांतरण करण्याची गरज आहे. ज्यावेळी संबंधित गावे महापालिकेकडे समाविष्ट करण्यात आली. तेव्हापासून हा विषय प्रलंबित होता.  याबाबत आमदार लांडगे यांनी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला आहे. दरम्यान, काही जागा या विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतर प्रक्रियेसाठी पाठवल्या असून, ती प्रक्रिया दीर्घ मुदतीची आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे सर्व हस्तांतरणाचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले असून, येत्या महिन्याभरात हे सर्व प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणावेत, अशा सूचनाही दिल्या आहेत.महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रियेबाबत मी स्वत: लक्ष घालून राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. वडमुखवाडी येथील जागा ही कृषी विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांचा मेळ नसल्यामुळे त्यांची स्वतंतत्र बेठक महसूल मंत्री यांच्याकडे घेण्यात येईल. कारण, सदर जागेमुळे पुणे-आळंदी रस्त्याचे काम रखडले आहे.तसेच, बो-हाडेवाडी येथे स.नं. ५४४ मध्ये मनपा शाळेकरीता आर्थिक तरतूद केली असून, सदर जागा १५ दिवसांत हस्तांतरण करुन या ठिकाणी शाळेची इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.---दिघीतील जागेवर लष्कराचे अतिक्रमणमहापालिका हद्दीतील शासकीय गायरान महापालिका उपयोगात आणण्यात येत असेल, तर त्या जागेचे तात्काळ हस्तांतरण करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले. तसेच, दिघी येथील स.न. ४३ मधील गायरान हे शासकीय मालकीचे असून, या ठिकाणी संरक्षण विभागाने अतिक्रमण केले आहे. संबंधित अतिक्रमण काढून घेण्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकायांनी दिली आहे. --- गायरान हस्तांतराबाबत राज्य शासनाकडे एकूण ७ प्रकरणे आहेत. ही प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्यावर १५ दिवसांत जिल्हाधिकारी संबंधित जमीन महापालिकेकडे हस्तांतर करुन महापालिका संबंधित जागेवर असलेले आरक्षण विकसित करणार आहे. चिखली येथे सीओईपीला जागा हस्तांतरण केल्यामुळे उर्वरित जागेची मागणी पत्र आल्यास ती जागा तात्काळ हस्तांतरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी प्रशासन आणि महापालिका प्रशासनातील सकारात्मक समन्वयामुळे जागा हस्तांतरण प्रक्रियेला गती मिळाली असून, संबंधित जागांवरील आरक्षण विकसित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.महेश लांडगे, आमदार 

टॅग्स :bhosariभोसरी