शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वीज दुर्घटनेसाठी एका ठिणगीचा अवकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:19 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : डीपीतील विजेच्या धक्क्याने माणसांसह जनावरांचा अपघात

रहाटणी : मागील वर्षापूर्वी चिंचवड येथे विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. त्या ठिकाणी तेल अंगावर पडून पोपट बनसोडे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. अगदी आठवड्यापूर्वी डांगे चौकात डीपीला आग लागून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. असे वारंवार का घडते याकडे महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी किंवा रोहित्राच्या जवळ जाऊन काम करणारे नागरिक काहीच धडा घेत नसल्याचे दिसून येत आहे.

गटई कामगार, फळ विक्रते, खाद्यपदार्थ विक्रते, अनधिकृत पार्किंग करणारे वाहनमालक यांसह अनेक व्यावसायिक विद्युत रोहित्र, डीपी, ट्रान्सफार्मरच्या खाली जवळपास व्यवसाय करताना दिसून येत आहेत. एखादा अपघात होण्याच्या आगोदरच त्यांना आवर घालण्याची गरज आहे. सध्या रहाटणी, काळेवाडी व पिंपळे सौदागर परिसराती अनेक मिनी विद्युत डीपी उघडेच आहेत़ त्यामुळे अपघात होऊ शकतात.

रहाटणी, पिंपळे सौदागर व काळेवाडी परिसरात अनेक व्यावसायिक विद्युत डीपी, उघडे रोहित्र, ट्रान्सफार्मरच्या जवळ किंवा त्याखाली बसून व्यवसाय करीत आहेत. मात्र हा प्रकार कधीतरी जिवावर बेतणारा आहे. याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.चिंचवड येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बनसोडे हे अनेक वर्षांपासून येथे गटई काम करीत होते़ मात्र आशा प्रकारे त्यांचा अंत होईल असे त्यांनाही माहीत नव्हते. बनसोडे हे अपंग होते़ त्यामुळे त्यांना कोणत्याच प्रकारची हालचाल करता आली नाही. तर डांगे चौकातीलअपघात का व कसा झाला हे आता तरी कोणालाही सांगता येत नाही त्यात एक अज्ञात व्यक्ती पूर्ण जाळून खाक झाला म्हणून यापासून सर्वांनीच धडा घेणे गरजेचे आहे़ तसेच याकडे विद्युत महावितरण मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.उघड्या वीजवाहिन्यांलगत टाकला जातो कचरा४रहाटणी येथील गारमळा कॉलनी समोर विद्युत डीपी आहे़ या विद्युत डीपीखाली मागील अनेक वर्षांपासून कचरा टाकला जातो़ मात्र या डीपीतून बाहेर आलेले काही वायर मोकळे आहेत़ त्या चालू की बंद हे जरी माहीत नसले तरी या ठिकाणी वायरी चालू असतील तर मोठा अपघात होऊ शकतो़ काही वाहनचालक या डीपीला अगदी लागूनच वाहने पार्क करतात़ त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडू नये म्हणून महावितरण कंपनीने ही वायर बंद असतील तर ते काढून टाकावेत व सुरू असतील तर त्याची योग्य काळजी घ्यावी़ त्यामुळे एखादा अनर्थ टळू शकतो़