शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

दौंडच्या दक्षिण भागात पेरणीची लगबग सुरू

By admin | Updated: September 26, 2014 05:50 IST

दौंड तालुक्यामधील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त भाग म्हणून दक्षिण पट्टयाची ओळख निर्माण झाली आहे.

खोर : दौंड तालुक्यामधील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त भाग म्हणून दक्षिण पट्टयाची ओळख निर्माण झाली आहे. परंतू या दक्षिण पट्टयामध्ये आॅगस्ट अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात केली आहे.जून च्या पावसाने धडी मारली असल्याने या भागामधील खरीप पिकाचा हंगाम कोलमडून पडला गेला होता. शेतकऱ्यांची उभीची-उभी पिके जळून गेली होती. मात्र आॅगस्टच्या शेवटी काही ठिकाणी मुसळदार तर काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असल्याने विहीरी, ओढे, नाले, तलाव यांना भरभरुन पाणी आले असल्याने दक्षिण पट्टयामध्ये असलेल्या खोर, देऊळगाव गाडा, नारायणबेट, माळवाडी, पडवी, कुसेगाव या परिसरामधील शेतकरी वर्गाने रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात केली आहे.रब्बी पिकांव्यतीरीक्त फेक कांदा, लागण कांदा, भाजी पाल्यांची पिके घेण्यात या भागातील शेतकरी मग्न झाला आहे. कोणी बैलजोडींच्या साहयाने तर कोणी ट्रॅक्टरच्या साहयाने रब्बी हंगामाची पेरणी करत आहे. या परिसरामध्ये बैलजोडींच्या साहयाने पेरणीला एकरी २५०० रुपये इतका भाव दिला जात असून ट्रॅक्टरच्या साहयाने रब्बी हंगामाच्या पेरणीला १८०० रुपये इतका भाव दिला जात आहे. काही ठिकाणच्या परिसरामध्ये जास्त पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांच्या शेताजमिनी पुर्णपणे ओलीताखाली गेल्या असल्याने त्या ठिकाणी पेरणी करणे देखील मुश्कील झाले आहे. शेतजमिनी मधील पाणी आटण्याची त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाट पाहण्याची वेळ आली आहे तर काही ठिकाणच्या परिसरामध्ये कमी पाऊस व त्याच वेळी पेरणी केलेल्या शेतामध्ये जास्त उष्णतेमुळे पिके जळून गेली असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली असल्याचे चित्र आहे. परंतू एकंदरीत रब्बी हंगाम तरी चांगल्या प्रकारे डौलारा धरील अशी अपेक्षा या भागातील शेतकरी वर्गाची आहे. (वार्ताहर)