शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

लवकरच २४ तास पाणी

By admin | Updated: August 29, 2016 03:12 IST

पाण्याची नासाडी रोखण्यासाठी आणि नागरिकांचे निरामय आरोग्य कायम ठेवण्यासाठी पिंपरी-चिंवचड महापालिकेच्या वतीने २४ बाय ७, अर्थात चोवीस तास पाणीपुरवठ्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे

पिंपरी : पाण्याची नासाडी रोखण्यासाठी आणि नागरिकांचे निरामय आरोग्य कायम ठेवण्यासाठी पिंपरी-चिंवचड महापालिकेच्या वतीने २४ बाय ७, अर्थात चोवीस तास पाणीपुरवठ्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या या प्रयत्नातून सर्वांना समान पाणीवाटप, पाणी बचत, जलजन्य आजारांपासून शहरवासीयांची सुटका होणार आहे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीची बेस्ट सिटीनंतर स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. उद्योगनगरीचा स्मार्ट सिटीत समावेश झाला नसला, तरी स्मार्ट योजना राबविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यापैकीच एक योजना म्हणजे चोवीस तास पाणीपुरवठा होय. पवना धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो. मंजूर कोटा ४६० एमएलडी असा आहे. सध्याचा पाणीपुरवठा २०२१पर्यंत पुरेसा आहे. सध्या शहराची लोकसंख्या वीस लाखांवर पोहोचली आहे. तर शहरात मीटरची संख्या १ लाख ४१ हजार एवढी आहे. शहरातील जलवाहिन्या या १८०० किलोमीटर लांबीच्या आहेत. चोवीस तास पाणीपुरठ्यात तीन टप्पे केले आहेत. पहिला टप्पा यमुनानगर, निगडी प्रभागात सुरू झाला आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील चाळीस आणि पन्नास टक्के भागाचा समावेश यात केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २४० कोटींच्या कामांना केंद्र आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यापैकी १४३ कोटींपैकी ११६ कोटींची कामे सुरू झाली आहेत. पहिल्या टप्प्यातील चाळीस टक्के भागाचा विचार करून कामास सुरुवात झाली आहे. केंद्राच्या अमृत योजनेतूनही या प्रकल्पाला निधी मिळणार आहे. यामध्ये प्रथम संबंधित भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच घरांपर्यंत पोहोचणाऱ्या वाहिन्यांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. तसेच या संदर्भातील आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर वाहिन्या बदलण्यात येणार आहे. सध्याच्या वाहिन्या या जीआय पाइपच्या आहेत. या वाहिन्या सहा ते सात वर्षांत गंजतात. लिकेज होऊन पाण्याची गळती होते. तसेच पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. त्यासाठी एमडीपी पाइप वापरण्यात येणार आहेत. त्यांचे आयुर्मान हे किमान तीस वर्षे आहे. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित पन्नास टक्के भागात ही योजना राबविण्यात येणार आहे. येत्या दहा वर्षांत शहरातील सर्व पाणीपुरवठा २४ तास करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)