शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

काही उमेदवार सैरभर, तर बहुतांश हतबल

By admin | Updated: September 27, 2014 07:30 IST

लोकसभा निवडणुकीनंतर सर्वत्र राजकीय चित्र बदलले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये वेगवान घडामोडी घडून आल्या

पिंपरी : लोकसभा निवडणुकीनंतर सर्वत्र राजकीय चित्र बदलले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये वेगवान घडामोडी घडून आल्या. त्यातच गुरुवारी युती तुटली. आघाडी फुटल्यामुळे उमेदवारीअर्ज भरण्यास एकच दिवस उरला असल्याने इच्छुक सैरभर झाले. बांधलेले अंदाज, आडाखे फोल ठरल्याने अनेकांवर हतबल होण्याची वेळ आली.विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली, तसे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष या प्रमुख पक्षांमधील इच्छुकांच्या हालचालींना वेग आला. मोदींच्या लाटेवार स्वार होण्याचे स्वप्न बाळगून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गजसुद्धा भाजप, शिवसेनेच्या वाटेवर होते. कोणत्याच पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वसुद्धा नाही, अशा इच्छुकांनीही भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर पक्षप्रवेश करता येईल, या उद्देशाने त्यांनी भाजपची उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न केले. काहींनी भाजपमध्ये प्रवेशसुद्धा केला. या घडामोडी सुरू असतानाच गुरूवारी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून युती तुटली. युती तुटल्याचे जाहीर होते ना होते तोच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतसुद्धा फूट पडली. युती, आघाडी संपुष्टात येताच विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून इच्छुकांनी आखलेली समीकरणे कोलमडली. उमेदवारी भरण्यासाठी एकच दिवस उरला असताना, युती, आघाडी संपुष्टात आल्याने निवडणूक लढण्यास तीव्र इच्छुक असलेल्यांना सैरभर धाव घ्यावी लागली. उमेदवारी मिळविण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. युतीच राहिली नाही, तर भाजप वा शिवसेना यांपैकी एका पक्षाची उमेदवारी मिळणे फायद्यात ठरणारे नाही, असा विचार करून काहींनी उमेदवारी नाकारली, तर काहींना उमेदवारी मिळणार नाही, असेऐनवेळी सांगण्यात आल्याने धक्काच बसला. अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्याने आता काय निर्णय घ्यायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. (प्रतिनिधी)