शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टसिटी, नदीसुधारला, एचए पुनर्वसनाला ठेंगा

By admin | Updated: February 2, 2017 03:54 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील स्मार्ट सिटी, नदीसुधार, एच. ए. कंपनी पुनर्वसन, चोवीस तास पाणी आदी प्रकल्पांचा विचार केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात केला नसल्याचे दिसून आले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील स्मार्ट सिटी, नदीसुधार, एच. ए. कंपनी पुनर्वसन, चोवीस तास पाणी आदी प्रकल्पांचा विचार केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात केला नसल्याचे दिसून आले. मेट्रोला निधी देण्यापलीकडे कोणतीही सकारात्मक योजना किंवा निधी न मिळाल्याने शहरवासीयांनी नाराजी व्यक्त केली.केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आज सादर झाला. त्यात पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी, नदीसुधार प्रकल्प, एच. ए. कंपनीचे पुनर्वसन, चोवीस तास पाणी, मेट्रोसाठी निधी आदी प्रकल्पांना चालना देण्यासंदर्भात निर्णय होतील, देहू आळंदी, तीर्थक्षेत्र विकास, लोणावळा पर्यटन विकासासंदर्भात निर्णय होईल, अशी शहरवासियांना अपेक्षा होती. यापैकी केवळ मेट्रोसाठी निधी देण्याची केंद्राने तरतूद केली आहे. मात्र, अन्य प्रकल्पांना निधी देणे किंवा प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. दहा वर्षांपासून पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीसुधार प्रकल्प राबविण्यासंदर्भात सहाशे कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी महापालिकेने केली होती. तसेच स्मार्ट सिटी समावेशावरून राजकारण झाले होते. गुणवत्ता असतानाही पिंपरी-चिंचवडला नाकारले होते. मात्र, पुणे मेट्रोच्या समारंभात नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटी समावेशाची घोषणा केली. त्यानंतर पिंपरी-चिंचवडकडून पुन्हा प्रस्ताव मागविण्यात आला होता. स्मार्ट सिटी समावेश झाल्यानंतर निधीची घोषणा होईल, अशीही अपेक्षा शहरवासीयांना होती. तसेच देशातील पहिला पेनिसिलिन औषधांचा प्रकल्प शहरात उभारला होता. मात्र, या प्रकल्पास गेल्या अनेक वर्षांपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांना महिनोनमहिने वेतन मिळणे अवघड झाले आहे. या कंपनीस पुनर्वसन पॅकेज मिळावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, खासदार शिवाजीराव आढळराव, अमर साबळे यांनी केली होती. त्यामुळे या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद होईल, पुनर्वसन पॅकेज मिळेल, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, याबाबत निर्णय झाला नाही.(प्रतिनिधी) घोषणांची नाही अंमलबजावणी१नोटांबंदीच्या निर्णयानंतर दिलासा मिळेल, असे वाटले होते. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्प फारसा उत्साहवर्धक नाही, शेतकऱ्यांची घोर फसवणूक झालेली आहे. सामान्य माणसाच्या कर मर्यादेत वाढ करण्यापलीकडे या अर्थसंकल्पात फारसे समाधानकारक नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढेल, असे सांगितले. मात्र, तशा उपाययोजना दिसत नाहीत.२सर्वशिक्षा अभियान, ग्रामसडक योजनांचा निधी वाढविण्यासंदर्भात काहीही निर्णय नाही. जुन्याच योजना, नवीन काहीही नाही. नोटांबदीची वाहवा, आणि डिजिटलायजेशन असे भारी शब्द वापरले आहेत. रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चा काही मिनिटांत संपविण्यात आला. त्यामुळे आम्हाला रेल्वेविषयी निर्णय काय, याबाबत माहिती दिली नाही, असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.