शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

वाकसई होणार ‘स्मार्ट व्हिलेज’

By admin | Updated: April 29, 2017 04:09 IST

मावळ तालुक्यात अल्पावधीत विकासकामांचा आलेख वाढविलेल्या वाकसई गावाची स्मार्ट व्हिलेजसाठी निवड झाली आहे.

लोणावळा : मावळ तालुक्यात अल्पावधीत विकासकामांचा आलेख वाढविलेल्या वाकसई गावाची स्मार्ट व्हिलेजसाठी निवड झाली आहे. अशी निवड झालेले वाकसई हे मावळातील एकमेव गाव आहे. राज्य सरकारने नव्यानेच सुरू केलेल्या स्मार्ट व्हिलेज संकल्पनेसाठी पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १३ गावांची निवड केली. याकरिता काही निकष ठरवत प्रत्येक तालुक्यातून तीन गावांची निवड करण्यात आली. त्या तीनमधून पडताळणी करून एक गाव निवडण्यात आले. वाकसई गावाला शंभरपैकी ७८ गुण मिळाल्याने गावाची स्मार्ट व्हिलेजसाठी निवड झाली.डोंगर उतारावर वसलेल्या वाकसई गावात प्रथमच महिला सरपंचपदाचा मान मिळालेल्या सोनाली जगताप, गावाच्या विकासासाठी अहोरात्र धावणारे उपसरपंच बाळासाहेब येवले, प्रशासकीय पातळीवर कसोशीने काम करणाऱ्या ग्रामसेविका निर्मला भुजबळ यांनी चार वर्षांपूर्वी विकास कामाचा आराखडा तयार करीत चार वर्षांत जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन समिती, ग्रामपंचायत निधी, आदिवासी विकास निधी, पंचायत समिती निधी आदींच्या माध्यमातून तब्बल चार कोटी रुपयांची ६४ विकासकामे केली. डोंगरावर राहणाऱ्या नागरिकांसह गावात सिमेंट-काँक्रिटचे रस्ते, घरोघरी पिण्याचे पाणी, एलईडी पथदिवे, गटारे, प्राथमिक आरोग्य केंद्र नूतनीकरण, घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी, स्मशानभूमी व निवारा शेड, गावात मध्यवर्तीठिकाणी आठवडेबाजार, गाव शंभर टक्के हगणदरीमुक्त, केंद्र व राज्य शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविणे, जलयुक्त शिवार व पाणलोट विभागांतर्गत जलसंधारण कामे झाली आहेत.(वार्ताहर)