शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट प्रचाराचा परवडेना खर्च

By admin | Updated: February 15, 2017 02:02 IST

पंचवार्षिक महापालिका निवडणुकीमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असून, प्रचारासाठी कालावधीही कमी असल्याने उमेदवारांना

रहाटणी : पंचवार्षिक महापालिका निवडणुकीमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असून, प्रचारासाठी कालावधीही कमी असल्याने उमेदवारांना मतदारापर्यंत पोहचण्यासाठी ह्यस्मार्टह्ण प्रचाराचा फंडा उमेदवारांनी शोधला असला, तरी त्यांना यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याने हा खर्च डोईजड होत आहे. सध्या फेसबुक,व्हॉट्स अप साइटवर दिवसाला हजारो कॉमेंट्स पडत आहेत. तर व्हॉटस अपच्या ग्रुपवर याहीपेक्षा जास्त पोस्ट पडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पैसे खर्च करून उमेदवार हातघाईला आले आहेत, तर पोस्ट वाचून मतदार हैराण झाले आहेत.मतदारांची लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येकाजवळ पोहोचणे कदापि शक्य नाही. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात उमेदवारांनी संगणकीकृत प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. संबंधितांकडून इंटरनेटचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी शहरातील व शहराबाहेरील शेकडो सोशल मीडिया चालविणाऱ्या कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. या कंपन्यांकडून मतदारांच्या संख्येनुसार दर निश्चित करून पॅकेज आकारले जात आहे. (वार्ताहर)व्हॉट्स अप पोस्ट नको ४तंत्रज्ञानाच्या युगात माणसाने जगाशी जोडलेले राहावे, ही काळाची गरज आहे. मात्र याचा त्रास निवडणुकीच्या काळात नकोसा झाला आहे. आपल्याला कोणीच ओळखत नाही अशा ग्रुपमध्ये आपला मोबाइल क्रमांक समाविष्ट केला जातो व एक ना अनेक पोस्ट मनात नसतानाही वाचाव्या लागत असतात. कोणती माहिती कधी मिळेल याचा भरवसा नसल्याने त्या ग्रुपमधून बाहेरही पडता येत नाही. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.लाइव्ह व्हिडीओ संकल्पना४सध्या निवडणुकीच्या हंगामात ‘फेसबुक लाइव्ह’ ही संकल्पना सर्वांत जास्त लोकप्रिय ठरत आहे. संबंधित उमेदवाराकडून फेसबुक लाईव्ह पर्याय निवडून त्या आधारे स्वत:ची चित्रफीत संबंधित प्रभागातील तरुणापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. यासाठी स्वतंत्र टेक्नोसेव्ह युवकांची नियुक्ती उमेदवारांकडून करण्यात आली आहे. या कामासाठी त्या कामाचाही पगार मोठ्या प्रमाणात द्यावा लागत आहे.व्हाईस रेकॉर्डिंगची डोकेदुखी४सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात हायटेक प्रचार यंत्रणेवर सर्वच उमेदवारांनी भर दिला आहे,मात्र याचा कोणाला त्रास होतोय काय,याचा विचारही कोणाच्या मणात येतो कि नाही देव जाणे मात्र सध्या व्हॉट्सअप, फेसबुक बरोबरच व्हाईस रेकॉर्डिंगलाही फार महत्व आले आहे . उमेदवाराच्या आवाजात हे रेकॉर्डिंग करण्यात येत आहे .