शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

ताथवडे येथील जनावरांची जोपासना करणाऱ्या क्षेत्रात वृक्षांच्या राजरोसपणे कत्तली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 16:16 IST

ताथवडे येथील राज्य शासनाच्या वळू माता प्रक्षेत्रात शेकडो वृक्षांच्या राजरोसपणे कत्तली करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्देशेकडो एकरावर हे महाराष्ट्र पशू विकास मंडळ वळू माता प्रक्षेत्र आहे. खात्रीशीर माहिती घेऊन दोषींवर आढळणाऱ्यांवर कडक कारवाई

पिंपरी-चिंचवड (वाकड) : संकरित जनावरांची निर्मिती करणाऱ्या ताथवडे येथील राज्य शासनाच्या वळू माता प्रक्षेत्रात शेकडो वृक्षांच्या राजरोसपणे कत्तली करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वृक्ष लागवड-संवर्धनासाठी शासकीय स्तरावर आटापिटा सुरू असताना ह्या निर्दयी वृक्षतोडीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. हिंजवडीचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सायकर यांनी लोकमतच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. ताथवडे बीआरटी रस्त्यालगत महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीतील शेकडो एकरावर हे महाराष्ट्र पशू विकास मंडळ वळू माता प्रक्षेत्र आहे. संकरित गाई आणि वळुंची पैदास आणि संगोपन करण्याचे काम येथे केले जाते. एका बाजूला पवना नदी आणि दुसऱ्या बाजूला घनदाट हिरवीगर्द झाडी असा हा संपूर्ण परिसर जंगल सदृश्य आहे. शेकडो वर्षांपूर्वीची हजारो झाडे येथे आहेत. जनावरांच्या चाऱ्याची देखील येथेच निर्मिती केली जाते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून मशीनच्या सहाय्याने तब्बल शंभरहुन अधिक अंदाजे २०-३० वर्षांची जुनी मोठी झाडे तोडण्यात आली आहेत. या वृक्षतोडीला परवानगी दिली कोणी ? ही वृक्षतोड करण्यामागे काय प्रयोजन ? वृक्षतोड झालेल्या ओंडक्यांचे पुढे काय केले जाते ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. याबाबत येथील व्यवस्थापक शिवाजी विधाते यांना विचारले असता ते म्हणाले वृक्षतोडीच्या आम्ही विरोधात आहोत.  जी बांधावरची तुटलेली झाडे होती तीच तोडण्यात आली आहेत तरीही काही चुकीचं घडलं असेल तर खात्रीशीर माहिती घेऊन दोषींवर आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. येथे तीन हजार पशूंची जोपासना केली जाणार आहे.

वृक्ष तोड अत्यंत चुकीची शासन वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत असताना त्यांच्याच जागेतच वृक्षतोड करून काहीजण मनमानी पद्धतीचा कारभार करीत आहे. त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी मी संबंधीत मंत्री महोदयांना पत्रव्यवहार करणार आहे. - दत्ता सायकर (सामाजिक कार्यकर्ते)

टॅग्स :wakadवाकडtathawdeताथवडेState Governmentराज्य सरकार