शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लवादाचा दावा प्रलंबित असताना ‘महामंडळा’कडून झाडांची कत्तल

By admin | Updated: May 31, 2017 02:29 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील निगडी-देहूरोडदरम्यानच्या रस्ता रुंदीकरणावेळी अडथळा ठरत असलेल्या वृक्ष महाराष्ट्र राज्य रस्ते

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळे गुरव : राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील निगडी-देहूरोडदरम्यानच्या रस्ता रुंदीकरणावेळी अडथळा ठरत असलेल्या वृक्ष महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाने हटविण्यास सुरूवात केली आहे. त्याविरोधात मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने हरित लवाद न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. दि. २५ मे रोजी न्यायालयात दाव्याची सुनावणी झाली. त्या वेळी रस्ते विकास महामंडळाकडून न्यायालयाला दिलेल्या झाडाच्या आकडेवारीची तफावत व महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन १९७५च्या कायद्यातील तरतुदीनुसार परवानगी नसताना केवळ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन कमांडन्ट स्टेशनक्वार्टस देहूरोड यांनी दिलेल्या नाहारकत दाखल्यावरून सदर ठिकाणी वृक्षतोड केली आहे़ ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर न्यायालयाने अ‍ॅडमिनिस्ट्रेशन कमांडन्ट स्टेशन क्वार्टस देहूरोड यांच्या ना हरकत दाखल्याविरोधात त्यांच्या आपिलेट अधिकारी यांच्याकडे आपिल करण्याचे निर्देश दिले, असे असताना रस्ते विकास महामंडळाकडून दि. ३० मे रोजी भक्ती-शक्ती चौकाच्या पुढील बाजूचे झाडे तोडण्यात आली. याबाबत निवासी जिल्हाधिकारी यांना फोनवरून माहिती असता त्यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलून कारवाईबाबत कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले आहेत. न्यायालयात दावा प्रलंबित असताना आज केलेल्या वृक्षतोड विरोधात पोलीस एफआयआर दाखल करण्याचे आदेश जिल्हाअधिकारी यांनी द्यावेत अशी मागणी संस्था करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, अण्णा जोगदंड, अ‍ॅड. रूपाली वाईकर, जावेद शेख, मुरलीधर दळवी, विकास शाहाने, अरुण मुसळे यांनी सांगितले.अडथळा ठरणारी झाडे तोडण्यास परवानगीदेहूरोड : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील देहूरोड ते निगडीदरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण कामात अडथळा ठरणारी ९९ झाडे तोडण्यास परवानगी मिळाली असून, त्यानुसार निगडीतील लष्करी पाणीपुरवठा केंद्र (एमईएस पंप हाऊस) व देहूरोड कॅन्टोन्मेन्टच्या जकात नाका भागातील झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. देहूरोड कॅन्टोन्मेन्ट हद्दीत निगडी ते देहूरोड दरम्यानच्या महामार्गालगत असणारी झाडे चौपदरीकरणात अडथळा ठरत आहेत. त्याविषयी महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे म्हणाले, ‘‘महामार्गाचे प्रत्यक्ष रुंदीकरण करताना अडथळा ठरणारी एकूण ९९ झाडे तोडण्याबाबत आदेश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार झाडे तोडण्यास ठेकेदारामार्फत सुरुवात करण्यात आली आहे.’’