शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्येही गगनचुंबी इमारती

By admin | Updated: January 23, 2017 03:02 IST

मुंबई-पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातही उंचच उंच गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इमारतींच्या

पिंपरी : मुंबई-पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातही उंचच उंच गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इमारतींच्या उंचीवर असलेली १०० मीटरची मर्यादा नवीन विकास नियंत्रण नियमावलीमध्ये (डीसी रूल) काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे कितीही उंच इमारत आता उभारता येणार आहे. डीसी रूलमध्ये करण्यात आलेली वाढीव एफएसआयची खैरात तसेच इमारतींच्या उंचीवरील काढून टाकण्यात आलेली मर्यादा यामुळे शहराची वाढ आडवी न होता उभी होणार आहे. मात्र शहरामध्ये ७० मीटरपेक्षा जास्त उंचीची इमारत बांधावयाची असल्यास समितीची परवानगी घ्यावी लागणार आहे. उंच इमारत उभारण्यात येणार असल्याच्या ठिकाणी रस्त्याची रूंदी ३० मीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर इतर मुलभूत सुविधा, दोन जिने आदी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आवश्यक बाबींची तरतुद त्या ठिकाणी करावी लागणार आहे. सरकारी समितीने सुपूर्त केल्यानंतर तब्बल वर्षभराचा विलंब करून राज्य सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा ५ जानेवारीला सादर केला, मात्र विकास नियंत्रण नियमावली राखून ठेवली. ती नुकतीच जाहीर करण्यात आली. महापालिकेने तयार केलेल्या नियमावलीत सरकारने फारसा फरक केलेला नाही. शहरातील मेट्रो सारख्या नव्या प्रकल्पांचा विचार करून काही नवे नियम मात्र लागू केले आहेत. विशेषत: बांधकाम व्यावसायिकांना एफएसआय सारख्या सवलती व क्लिष्ट नियमातून सुटका दिल्यामुळे येत्या काळात शहरामध्ये परवडणाऱ्या घरे मोठ्या संख्येने तयार होतील असा या क्षेत्रातील जाणकारांचा प्राथमिक अंदाज आहे. (प्रतिनिधी)