शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गाडीला ट्रॉली धडकल्याने सहा जखमी

By admin | Updated: January 8, 2015 23:15 IST

दौंड-गोपाळवाडी रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे उद्यानाजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीची पीन सटकल्याने रिकामी ट्रॉली मागे येऊन एका खाद्य पदार्थाच्या गाडीला धडकल्याने सहा जण जखमी झाले आहे.

दौंड : दौंड-गोपाळवाडी रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे उद्यानाजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीची पीन सटकल्याने रिकामी ट्रॉली मागे येऊन एका खाद्य पदार्थाच्या गाडीला धडकल्याने सहा जण जखमी झाले आहे. जखमीमध्ये दोन लहान मुली आणि एक मुलाचा सामावेश आहे. ही घटना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. जर ही घटना सायंकाळी घडली असती, तर मोठा अपघात झाला असता. सालोमन डॅनियल (रा. दौंड), खाद्य पदार्थ विक्रेता (नाव समजू शकले नाही), संगीता झाडे (वय ४५), श्रद्धा झाडे, सोनीया झाडे, संकेत झाडे (सर्व रा. सरस्वतीनगर गोपाळवाडी, दौंड) हे जखमी झाले आहेत. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास डबल ट्रॉली लावलेला ट्रॅक्टर भरधाव जात असताना अचानक मागच्या ट्रॉलीची पीन सटकली अन् एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली पुढे गेली आणि पीन सटकलेली ट्रॉली मागे आली आणि खाद्य पदार्थाच्या गाडीला धडकली. या वेळी वरील सर्व जखमी खाद्य पदार्थ गाडीच्या परिसरातून जात असताना या अपघातात जखमी झाले आहे. अपघात घडताच ट्रॅक्टरचालक पळून गेला, तर परिसरातील नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले. या परिसरातील रस्ते अरुंद असल्याने त्यातच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर टेप रेकॉर्डर लावून वेगाने पळवात असतात. परिणामी, बऱ्याचदा उसाने भरलेल्या ट्रॉल्या पलटी झालेल्या आहेत. मात्र, नियमबाह्य होणाऱ्या या वाहतुकीकडे आरटीओचे अधिकारी दुर्लक्ष का करतात, असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.