शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल यंत्रणा बंदने खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:08 IST

नागरिकांना प्रवास करताना जीवघेणा ठरत असलेल्या मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या बाणेर परिसरातील राधा चौकात बंद अवस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी महापालिका

वाकड : नागरिकांना प्रवास करताना जीवघेणा ठरत असलेल्या मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या बाणेर परिसरातील राधा चौकात बंद अवस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी महापालिका व वाहतूक विभागाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.दिवसभरात हजारो वाहनांची ये-जा सुरू असलेल्या या चौकात सिग्नल उभारण्यात आले असले, तरी केवळ पिवळा दिवा लुकलुकत असल्याने नागरिक संभ्रमावस्थेत प्रवास करीत आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाºया चौकात सिग्नल सुरू करण्यास पालिका व वाहतूक विभागातर्फे विलंब केला जात असल्याने या चौकातून नियमित प्रवास करणाºया नागरिकांकडून कमालीचा असंतोष व्यक्त केला जात आहे.लाखो रुपये खर्च करून राधा चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले आहेत; मात्र हे वाहतूक नियंत्रक दिवे केवळ शोभेची वस्तू झाली आहे. परिणामी, छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. मुंबई-बंगळुरू या द्रुतगती मार्गावरील राधा चौकात बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, पाषाण या ठिकाणी ये-जा करण्यासाठी चार प्रशस्त रस्ते आहेत. या महामार्गाच्या बाजूलाच नागरिकांना प्रवासासाठी सेवारस्त्यांची सुविधा आहे. अनेक वर्षांपासून या चौकात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली; मात्र अनेक महिने उलटूनही अद्याप सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होऊ शकलेली नाही. वाहनचालक इतर वाहनांचा अंदाज घेत आहेत.