शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी आजारी पडाल, तर पस्तावाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2015 00:33 IST

अत्यावश्यक सेवा असताना महापालिकेचे बहुतांश दवाखाने रविवारी बंद असल्याचे आढळले. सर्वसामान्य माणसांनी रविवारी आजारी पडू नये,

पिंपरी : अत्यावश्यक सेवा असताना महापालिकेचे बहुतांश दवाखाने रविवारी बंद असल्याचे आढळले. सर्वसामान्य माणसांनी रविवारी आजारी पडू नये, असा सल्लाच त्यातून दिला जात आहे, अशी उपरोधिक टीका होत आहे. दवाखाने बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे चित्र रविवारी लोकमत टीमने केलेल्या पाहणीतून दिसून आले. अनेक गोरगरीब नागरिक दवाखाना बंद असल्याचे पाहून माघारी फिरत असल्याचे चित्र दिसले. हे दवाखाने रविवारी सुरू ठेवणे गरजेचे आहे. परंतु याकडे प्रशासन लक्ष देत नाही. तर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे टीका होत आहे. सर्व दवाखाने रविवारी सुरू ठेवावेत, अशी मागणी होत आहे. वाल्हेकरवाडीतील दवाखान्याला सुटीरावेत : रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडी, चिंतामणी चौक, गुरुद्वारा चौक, बिजलीनगर आदी परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी वाल्हेकरवाडी येथे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दवाखाना चालविला जातो. रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणची असणारी व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणारे दवाखाने अत्यावश्यक सेवेमध्ये आहेत. दररोज दवाखाने सुरू असणे अपेक्षित आहे. परंतु आज रविवारी दवाखाना बंद होता. परिसरातून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय पहावयास मिळाली. रुग्णांना जिना चढून जाणे जिकिरीचे होते. नेहरूनगरमध्ये नागरिकांची गैरसोयनेहरूनगर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेहरूनगर, विठ्ठलनगर ,बालाजीनगर, गवळीमाथा, यशवंतनगर आदी परिसरातील नागरिक उपचारासाठी येतात. रविवारी हे केंद्र दिवसभर बंद असते. त्यामुळे रविवारी नागरिकांची गैरसोय होते. या केंद्रामध्ये एक वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सहा कर्मचारी काम करीत असतात. या ठिकाणी नागरिकांवर प्राथमिक उपचार केले जातात. या केंद्राची सोमवार ते शुक्रवार वेळ सकाळी ८ ते ४ अशी असून, केस पेपर काढण्याची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ आहे. केस पेपरसाठी १० रुपये दर आकारला जातो. हे केंद्र रविवारीदेखील सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.काळा खडक दवाखाना बंदवाकड : वाकड,काळाखडक येथील बाह्य रुग्ण (ओपीडी) दवाखाना शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी पूर्ण दिवस बंद असल्याने गैरसोय होत आहे. येथील दोन झोपडपट्ट्या, वाढते गृहप्रकल्प आणि त्यावर काम करणारे मजूर या सर्वांमुळे येथील लोकसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णालय रविवारी बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, दवाखाना रविवारी देखील सुरु ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मजूर असतात. त्यांची गैरसोय होत आहे.बोपखेलमध्ये सुविधांचा अभावबोपखेल: बोपखेलमधील दवाखाना रविवारी बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.आरोग्य केंद्र आहे, तर त्याच्या सुविधांचा लाभ नागरिकांना मिळणे गरजेचे आहे, असे गावातील नागरिकांचे सांगणे आहे. बोपखेलमधील महापालिकेच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार केले जातात. रक्त तपासणीसाठी भोसरी येथील पालिकेच्या दवाखान्यात जावे लागते. या तपासण्या बोपखेल मधील दवाखान्यातच केल्या जाव्यात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. परंतु नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसत आहे.