शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

शाळांमध्ये घुमला विठुनामाचा जयघोष

By admin | Updated: July 4, 2017 03:48 IST

पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची आस पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसोबतच उद्योगनगरीतील शाळांमध्ये शिकत असलेल्या बालचमूंनाही

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची आस पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसोबतच उद्योगनगरीतील शाळांमध्ये शिकत असलेल्या बालचमूंनाही लागली आहे. प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नाही, मात्र या वारीचा अनुभव मुलांना घेता यावा, यासाठी शहरातील बहुतांशी शाळांनी पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या दिंडींमधून झाडे लावा झाडे जगवा, पाणीबचत अशा विविध विषयांवर घोषणा दिल्या जात होत्या. तर दुसरीकडे विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम, ज्ञानेश्वरमहाराज, मुक्ताई यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. पारंपारिक वारीचे स्वरुप यावे यासाठी अनेकांनी वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता. टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकही तल्लीन झाले. अनेक शाळांमध्ये कीर्तन, भारुड, वृक्षारोपण अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. थोडक्यात पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची आस थोरांसोबत लहानग्यांमध्येही किती आहे, हे प्रकर्षाने पहायला मिळाले.पिंपळे गुरव : दापोडीतील द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडिअम स्कूल व जुनी सांगवीतील मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना संतांचे कार्य समजावे यासाठी विठूनामाचा गजर करण्यात आला.दिंडीमध्ये पर्यावरणविषयी जागृती करण्यात आली. वृक्षदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा, झाडे वाचवा’, ‘वृक्ष हेच जीवन’ अशा घोषणा देत वृक्षांचे महत्त्व समजावून सांगितले. वारकरी पोशाख परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात ही वृक्षदिंडी काढण्यात आली. ६५० विद्यार्थ्यांनी नृत्य, अभंग, श्लोक, प्रवचन, पसायदान सादर केले. विजूअण्णा जगताप, शंकर जगताप, चंद्रकांत इंदुरे, डॉ. विकास पवार, प्रताप बामणे, मुख्याध्यापिका जयश्री माळी, सारिका गांगर्डे यांनी नियोजन केले. जुनी सांगवी येथील मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक विभागात पार पडला. शाळेच्या प्रांगणात मुख्याध्यापिका जाधव प्रमिला यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक एकनाथ ढोरे हे पालखी सोहळ्यात उपस्थित होते. परिपाठात भजन-कीर्तन घेऊन ऊर्मिला शिरोडे यांनी वृक्षदिंडीचे महत्त्व सांगितले.ढोल-ताशांच्या गजरात लेझीमच्या तालावर पालखी सोहळा मार्गस्थ झाला. संत वेशातील बालचमूंनी पालखीची शोभा वाढवली. विठ्ठल मंदिराजवळ पालखीचे रिंगण लेझीम पताका व टाळ यांच्या जयघोषात सजले. परिसरातील नागरिकांनी औषधी वनस्पतींचे उपयोग हस्तलिखित विद्यार्थ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. झिम्मा फुगडी निमित्ताने पालखीत नागरिकांनी सहभाग घेतला. वृक्षदिंडीनिमित्त वृक्षवाटप झाले. लेझीम पथकाला मार्गदर्शन मनीषा दरेकर यांनी केले.पर्यावरणाचा संदेशपिंपरी : लिटिल चॅम्प्स प्री-स्कूलमध्ये पालखी सोहळा पार पडला. या प्रसंगी बालचमूंनी साजेसा पोशाख परिधान केला होता. तसेच विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा’ असे विविध संदेश परिसरातील लोकांना दिले. या वेळी संस्थेचे संस्थापक लक्ष्मण चोरघडे, अध्यक्ष अमोल चोरघडे, संचालिका कविता चोरघडे, स्नेहल सुर्डी, आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वारीचे महत्त्व समजावे यासाठी सोहळ्याचे आयोजन केले होते. वेळी शैलजा मोरे, सुशीला ढोंबरे, विजया टिळेकर, सुनीता माने, अपर्णा शिंदे, विद्या मराठे आदी उपस्थित होते.