शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांकडून भूखंडाचे ‘श्रीखंड’

By admin | Updated: September 21, 2015 04:04 IST

पिंपरी, भोसरी व चिंचवड भागात उद्योगाच्या नावावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडून (एमआयडीसी) भूखंड खरेदी केले जातात

नीलेश जंगम, पिंपरीपिंपरी, भोसरी व चिंचवड भागात उद्योगाच्या नावावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडून (एमआयडीसी) भूखंड खरेदी केले जातात. तेथे काही काळापुरता उद्योग-व्यवसाय केला जातो. नंतर याच भूखंडावर इमले बांधून तिथे संसार केला जातो. काही ठिकाणी ‘नीचे मकान उपर दुकान’ अशी परिस्थिती आहे. दाखवण्यापुरते व्यवसाय केले जातात किंवा एखाद-दुसरे बंद यंत्र ठेवले जाते. मात्र, वरच्या मजल्यावर राहण्यासाठी घरे बांधली जातात. उद्योगासाठी कमी दरात एमआयडीसीकडून भूखंडाची खरेदी केली जाते. मात्र, ते भूखंड निवासासाठी लाटले जाऊन एमआयडीसीची फसवणूक केली जात आहे. एकीकडे पिंपरी-चिंचवड शहरातील जागांचे भाव आकाशाला भिडले आहेत. दुसरीकडे उद्योगनगरीत मंदीचे सावट पसरले आहे. इतर जागांच्या तुलनेत एमआयडीसीचा भूखंड कमी दरात मिळतो. यामुळे अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून एमआयडीचे भूखंड खरेदी केले जातात. उद्योग न चालल्यास राहण्यासाठी किमान घर तरी होईल, या हेतूने राजरोसपणे भूखंड लाटण्याचे प्रकार शहरात सुरू आहेत. नियमानुसार एमआयडीसीचा भूखंड खरेदी केल्यानंतर ठरावीक कालावधीत विकसित न केल्यास एमआयडीसीकडून कारवाई केली जाते. काही उद्योजकांना येणाऱ्या अडचणींमुळे त्यांना एमआयडीसीकडून घेतलेल्या भूखंडाचा लाभ घेता येत नाही. दिलेल्या मुदतीत व्यवसाय सुरू न करता आल्याने ते अपात्र ठरतात. यामुळे त्यांच्याकडून भूखंड जप्त केले जातात. परंतु, उद्योजकांसाठीचे भूखंड निवासी वापरासाठी घेणाऱ्यांकडे एमआयडीसीचे अधिकारी डोळेझाक करतात. अशा प्रकारचे भूखंड विक्री करण्यामध्ये एमआयडीसीचेच काही अधिकारी, कर्मचारी, तर काही निवृत्त अधिकारीही सक्रिय आहेत. औद्योगिकचे निवासी व व्यापारी भूखंडात रुपांतर करण्याची तरतूद झाली. लोकवस्तीच्या भागातल्या औद्योगिक भूखंडांचे निवासी व व्यापारी भूखंडात रुपांतर करण्याकरिता परवानगी मिळाली. असे अनेक भूखंड रुपांतरित झाले. भारनियमनाची चिंता नाहीउद्योजक म्हणून ज्या सोयी-सुविधा मिळतात, त्याचा फायदा निवासासाठी केला जातो. एमआयडीसीकडून वीज, पाणी व इतर सुविधा मुबलक प्रमाणात मिळतात. शहरातील इतर रहिवासी भागाच्या तुलनेत या सुविधा महाग असल्या, तरी पूरक प्रमाणात मिळतात. या सुविधांचा लाभ घेत लोक येथे पिढ्यान्पिढ्या राहत आहेत. शहरातील अनेक भागांत पाण्याची कमतरता आहे. अनेक सोसायट्यांमध्ये शेवटच्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचत नाही. एमआयडीसीत विजेच्या बाबतही विजेच्या भारनियमानाची चिंता नसते. अधिकाऱ्यांशी हातमिळवणीएमआयडीसीकडून घेतलेल्या भूखंडाचा पुरेपूर वापर केला जातो. एकाच छताखाली कारखाना, कार्यालय, घर सगळेच उभारण्यात येते. अनेक ठिकाणी तर पिढ्यान्पिढ्या लोक राहत असल्याचे चित्र पाहायला मिळते. इतर ठिकाणी कामाला असणाऱ्या नातेवाइकांसह लोक या भूखंडाचा पुरेपूर फायदा घेत आहेत. अनेकांना उद्योगातले काहीही ज्ञान नसतानही केवळ नावाला दिखाव्यासाठी एखादे यंत्र ठेवले आहे. एमआयडीसीच्या अधिकारी-कर्मचारी यांना हाताशी धरून भूखंड घेतले जात असल्याने बिनधास्तपणे व राजरोसपणे या भूखंडावर संसार थाटले जात आहेत.