शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी राहत असलेली दुकाने धोकादायक

By admin | Updated: January 1, 2017 04:35 IST

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार ज्या ठिकाणी छोट्या जागेत दुकान आहे, त्या दुकानातच कर्मचारी राहतात. अशी ठिकाणे आगीच्या घटनांना निमंत्रण देणारी ठरतात.

पिंपरी : अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार ज्या ठिकाणी छोट्या जागेत दुकान आहे, त्या दुकानातच कर्मचारी राहतात. अशी ठिकाणे आगीच्या घटनांना निमंत्रण देणारी ठरतात. पुण्यात कोंढव्यात बेकरीला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील बेकरी कितपत सुरक्षित आहेत, याचा आढावा घेतला असता, महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी बेकरी अथवा दुकानातच कर्मचारी राहतात, अशी ठिकाणे आगीच्या घटनांना निमंत्रण देणारी ठरू शकतात, असे निरीक्षण नोंदवले आहे. पुण्यातील कोंढवा येथे घडलेल्या दुर्घटनेचे कारणसुद्धा हेच असल्याचे अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे यांनी नमूद केले. ते म्हणाले, जसे पेट्रोल पंप, गॅस एजन्सी या ठिकाणी कधीही धोकादायक स्थिती उद्भवू शकते, तसे बेकरीचे नाही. अग्निशामक दलाच्या दृष्टीने धोकादायक आस्थापनामध्ये बेकरीचा समावेश होत नाही. बेकरीचा माल उत्पादन करण्यासाठी भट्टीचा वापर होतो. बहुतांशी हॉटेलमध्येही भट्टी असते. त्यामुळे अशा आस्थापनांमध्ये दक्षतेच्या उपायययोजना केल्याच पाहिजेत, असे बंधनकारक केले जात नाही, असेही अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड परिसरात ‘निचे दुकान, उपर मकान ’ अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. छोट्या जागेत सुरू केलेल्या दुकानांमध्ये पोटमाळ्यावर कामगारांना झोपण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली असते. अगोदरच कमी जागा, त्यात दुकानाच्या साहित्याबरोबर कामगारांच्या साहित्याची भर पडते. छोटेखानी दुकानात जागेच्या कानाकोपऱ्यांत वस्तू ठेवल्याने खोली भरगच्च होते. दुकान खाद्यपदार्थ तयार करण्याचे नसले, तरी राहणाऱ्या कामगारांसाठी तेथे रॉकेलचा स्टोव्ह अथवा गॅस उपलब्ध करून दिलेला असतो. कधी तरी त्या कामगारांपैकी कोणी हलगर्जीपणा दाखवला, तर दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. पिंपरी-चिंचवडमध्ये किराणा मालाच्या दुकानात कुटुंबासह राहणारे काही व्यापारी आहेत. मिठाईच्या दुकानांमध्ये अशीच परिस्थिती असते. गादी तयार करण्याची छोटी दुकाने अर्थात गादी कारखाने अशा ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडण्यास पूरक परिस्थिती निमाण होते. त्या ठिकाणी त्या लोकांनी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे. दुकानात कामगारांना राहण्यास मुभा नसावी. कामगारांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सुचविले आहे. (प्रतिनिधी)कुदळवाडी आगीच्या घटनांचे आगार चिखली, कुदळवाडी परिसरात महिन्यात एकदा तरी आगीची घटना घडतेच. चिखली, कुदळवाडीतील भंगार मालाच्या दुकानांना मोठ्या स्वरूपात आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. भंगार मालाची तसेच लाकडी वस्तूंची गोदामे, दुकाने एकाला एक चिकटून आहेत. सुमारे बारा ते चौदा तास येथील आग आटोक्यात येत नाही. अग्निशामक दलाचे बंब, पाण्याचे कित्येक टँकर खाली करावे लागतात. या घटना वारंवार घडू लागल्या असताना, कोणत्याही दक्षतेच्या उपाययोजना केल्या जात नाहीत.