शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेत्याला मारहाण करून दुकान पेटविले

By admin | Updated: December 27, 2016 03:20 IST

चप्पल खरेदीवरून झालेल्या वादंगातून चिडून टोळक्याने रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पिंपरी, मोरवाडीतील विक्रेत्यावर कोयत्याने वार केले.

पिंपरी : चप्पल खरेदीवरून झालेल्या वादंगातून चिडून टोळक्याने रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पिंपरी, मोरवाडीतील विक्रेत्यावर कोयत्याने वार केले. तसेच पेट्रोल टाकून दुकान पेटविले. त्यामध्ये विक्रेत्याचे अंदाजे १६ लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना मोरवाडी येथे घडली. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरशाद खान यांचे मुंबई- पुणे महामार्गालगत मोरवाडी येथे चप्पल विक्रेचे दुकान आहे. रविवारी रात्री मुन्ना, मोदक, प्रकाश आणि ऋतीक हे चप्पल घेण्यासाठी खान यांच्या दुकानात आले होते. त्या वेळी त्यांनी ५०० रुपयांची चप्पल खरेदी केली. आरोपींनी १५० रुपये कमी देणार, असे सांगितले. मात्र, कमी किमतीत चप्पल विक्री करणे परवडत नाही, असे विक़्रेत्याने सांगितले. त्या वेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. इरशाद खान या विक़्रेत्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मुन्ना उर्फ महेश चंदनशिवे (वय २४), मोदक उर्फ दीपक नवरत्ने (वय २०, रा. घरकुल चिखली), प्रकाश मगर (वय १९), ऋतीक पांढरे (वय १८), बालाजी ओगले (वय १८), मुन्ना वाल्मीकी (वय २४), आकाश उर्फ बाँड मोहोळ (वय १९), अतुल निसर्गंध (वय १९) यांच्यासह एका अल्पवयीन आरोपी आणि तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचा प्रयत्न केल्याचे त्यात नमूद केले आहे. प्रकरणी अफजल इसरार खान (वय २५) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मुन्ना याने खान यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. त्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत माजविली. त्यामुळे नागरिकांनी दुकाने बंद केली. रात्री पावणेबाराच्या सुमारास आरोपीने साथीदारांना बोलावून घेतले. रॉकेल आणि पेट्रोल ओतून दुकान पेटवले. त्यामध्ये खान यांच्या दुकानासह आजूबाजूच्या दुकानांचे नुकसान झाले. पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक आयुक्त राम माडूंरके, पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन याबाबतची माहिती घेतली. (प्रतिनिधी)