शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसह्याद्रीने केला भैरवगड सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:02 IST

संस्थेच्या सभासदांनी जुन्नर, गणेशखिंडमार्गे माळशेज घाटात पोहोचून आवळे गावातून गड चढण्यास सुरुवात केली. सभासदांच्या ११ जणांच्या गटामध्ये दोन लहान

पिंपरी : भोसरी येथील शिवसह्याद्री अ‍ॅडव्हेंचर्सच्या सभासदांनी नुकताच भैरवगड सर करण्याची कामगिरी केली आहे. माळशेज घाट व नाणे घाटाच्या कुशीत पाचशे फूट उंचीचा भैरवगड हा विशाल गड आहे. दहा वर्षांनंतर संस्थेच्या सुभाष नाकते, नागेश पडवळ, आनंद बिराजदार, किरण कदम, मुकेश राठोड, वैभव बांगर, दीपक खेडकर, कालिदास बवले, भरत भसे, सोमनाथ कोळी, जयतु नाकते, वरुण पालांडे यांनी ही कामगिरी केली.

संस्थेच्या सभासदांनी जुन्नर, गणेशखिंडमार्गे माळशेज घाटात पोहोचून आवळे गावातून गड चढण्यास सुरुवात केली. सभासदांच्या ११ जणांच्या गटामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता. भैरवगडाच्या पायथ्याजवळ भिंतीतच पाण्याचे टाके आहे. यामध्ये बारा महिने पाणी असते. तेथे जेवण करून विश्रांती घेण्यात आली. तेथे बेसकॅम्प लावून मुक्काम करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला एका तासात १२५ फुटांवर असलेले पहिले स्टेशन सर करण्यात आले. त्यानंतर एकमेकांना मदत करत सायंकाळी पाचला पाचवे स्टेशन सर करण्यात आले. भैरवगडाच्या माथ्यावरून जय भवानी, जय शिवाजी व भैरवनाथाच्या नावाने चांगभले या घोषणा देण्यात आल्या.दहा वर्षांनंतर शिवसह्याद्री अ‍ॅडव्हेंचर्सच्या सभासदांनी हा गड सर केला. गडावर जाऊन निसर्गाचा मनसोक्त आनंद सभासदांनी घेतला. गड सर करण्यासाठी सर्व सुरक्षेची साधने वापरण्यात आली होती. तसेच सभासदांनी इतिहासकालीन युद्धांच्या व पराक्रमाच्या गोष्टीविषयी चर्चा केली. त्यामुळे सदस्यांमध्ये इतिहासासंबंधी आवड निर्माण झाली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFortगड