शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सुसाईड नोट लिहिणारी शिवानी उत्तीर्ण

By admin | Updated: May 31, 2017 02:27 IST

बारावीचा निकाल जाहीर होणार असे व्हॉट्सअ‍ॅपवर वारंवार येत होते. बारावीच्या निकालाची तारीख एसएससी बोर्डाकडून निश्चित झाली

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : बारावीचा निकाल जाहीर होणार असे व्हॉट्सअ‍ॅपवर वारंवार येत होते. बारावीच्या निकालाची तारीख एसएससी बोर्डाकडून निश्चित झाली नव्हती, बारावीचा निकाल आज जाहीर होणार असे २३ मे रोजी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाले. परीक्षेचे पेपर अवघड गेले असल्याने उत्तीर्ण होण्याची साशंकता मनात होती. नापास झाल्यास घरचे रागवतील, या भीतीने शिवानीने आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी ठेवून घर सोडले. शिवानी घरातून निघून गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या तिच्या पालकांनी पोलिसांकडे ती बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली. जिवाचे काही बरे वाईट करेल, या भीतीने घरातील सर्व जण काळजीत असताना, शिवानी दुसऱ्या दिवशी घरी सुखरूप परतली. सर्वांना सुखद धक्का बसला, एवढेच नव्हे तर ५६ टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली असल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला.‘‘परीक्षेचे पेपर मला अवघड गेले आहेत, मला माहिती आहे की, परीक्षेत नापास होणार आहे, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे,’’ अशी सुसाईड नोट लिहून शिवानी रवींद्र राजपूत (वय १९, रा. संगमगर, जुनी सांगवी) ही तरुणी २३ मे रोजी घरातून कोणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाली होती. परीक्षेच्या निकालच्या धास्तीने शिवानी घरातून निघून गेली़ ती केतकावळे येथील बालाजी मंदिरात गेली. तेथेच तिने रात्र काढली. नैराश्येपोटी, परीक्षेचा निकाल काय लागणार या भीतीने तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. मात्र, तिचे मनपरिवर्तन झाले. तिने स्वत:ला सावरले. दुसऱ्या दिवशी सकाळी ती घरी परतली. शिवानी सुखरूप घरी आल्याचा सुखद धक्का सर्वांना बसला. शिवाय मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात शिवानीने चक्क ५६ टक्के गुण मिळविले असल्याने राजपूत कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झाला.