शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

Pimpri Chinchwad: इंद्रायणी नदीमधील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

By विश्वास मोरे | Updated: February 29, 2024 13:11 IST

या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रभावीपणे प्रक्रिया होऊन नदीमध्ये मिसळणारे रासायनिक व दूषित पाणी रोखण्यास मदत होते आहे....

पिंपरी : इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कुदळवाडी येथे  प्रत्येक दिवशी ३ दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) कार्यान्वित केला आहे. या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रभावीपणे प्रक्रिया होऊन नदीमध्ये मिसळणारे रासायनिक व दूषित पाणी रोखण्यास मदत होते आहे.

इंद्रायणी नदीच्या प्रदूषण पातळीबाबत नॅशनल रिव्हर कॉन्झर्वेशन डायरेक्टरेटने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये नदीच्या प्रदूषण पातळीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चिखली, कुदळवाडी, जाधववाडी परिसरातील औद्योगिक कारखाने, गोदामे आणि अनधिकृत व्यवसायांमधून रासायनिक पाणी, तेल व ग्रीसचे होणारे विसर्जन यातून प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कुदळवाडी जाधववाडी येथील नाल्यालगतचे अतिक्रमण सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी मोकळे करण्यात आले. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्देशांनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सदर समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत.

प्रक्रिया केलेल्या पाण्याचा होतोय पुर्नवापर

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया केलेले पाणी व्यावसायिक, नागरिक, बांधकाम व्यावसायिकांना मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रोत्साहन देत आहे. यासाठी प्रक्रिया केलेले पाणी पाच मिनिटांत टँकरमध्ये भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पाण्याचा वापर केल्याने नदीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

इंद्रायणी नदीचे रक्षण हेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राधान्य आहे. महापालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासारख्या शाश्वत उपायांची अंमलबजावणी करून प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देत आहे. यातून समाजाचे व पर्यावरणाचे कल्याण होण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्नशील आहे.

- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

नदी प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी म्हणजे एक महत्वाचा टप्पा आहे. महापालिका प्रदुषणासारख्या विषयांवर नाविन्यपूर्ण उपायांचा वापर करून पर्यावरण संवर्धनासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या सुचनेनूसार आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय पावले उचलत आहे.

- संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका