शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेने बांधलेले सात गाळे धूळ खात पडून

By admin | Updated: April 26, 2017 03:48 IST

महापालिकेच्या वतीने किवळे येथील मुकाई चौकात उभारण्यात आलेल्या बीआरटी बस टर्मिनलचे एकोणीस महिन्यांपूर्वी लोकार्पण झाले़

किवळे : महापालिकेच्या वतीने किवळे येथील मुकाई चौकात उभारण्यात आलेल्या बीआरटी बस टर्मिनलचे एकोणीस महिन्यांपूर्वी लोकार्पण झाले़ या ठिकाणी प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेले सात गाळे अद्यापही बंद असून, प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. महापालिकेने किवळे - सांगवी बीआरटी मार्गावर किवळेतील मुकाई चौकात सुमारे एक कोटीहून अधिक रक्कम खर्च करून उभारलेले सुसज्य बस टर्मिनल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एकोणीस महिन्यांपूर्वी (५ सप्टेंबरला २०१५) लोकार्पण करण्यात आले आहे. येथून मनपा भवन, पुणेसाठी सकाळी सहापासून रात्री अकरापर्यंत दर दहा मिनिटांनी बससेवा उपलब्ध केली असल्याने परिसरातील व नजीकच्या ग्रामीण भागातील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या ठिकाणी पीएमपी प्रशासनाच्या वतीने पास केंद्रही सुरू करण्यात आलेले आहे. परिणामी प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून, पीएमपी प्रशासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या प्रवाशांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. किवळे बस टर्मिनल उभारताना प्रामुख्याने प्रवाशांना लागणाऱ्या वस्तूंची तातडीने उपलब्धता होण्यासाठी प्रामुख्याने वर्तमानपत्र, साप्ताहिके, पाक्षिक व मासिके विक्री केंद्र , अल्पोपाहार केंद्र, प्रवासात लागणाऱ्या किरकोळ वस्तू विक्री केंद्र, शीतपेये विक्री केंद्र आदी वस्तू विक्री व अन्य सेवा केंद्रांसाठी एकूण सात गाळ ेमहापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेले आहेत. आजमितीला सर्व सातही गाळे बंद स्थितीत आहेत. दरम्यान, ताब्यात दिलेले चार गाळे तातडीने सुरू होणे अपेक्षित असून, ताबा देऊन तेरा दिवस उलटले असताना एकही गाळा सुरू करण्यात आलेला नसून, हे चारही गाळे कधी सुरू होणार याबाबत प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. गाळे बंद असल्याने या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची तसेच पीएमपी सकाळ व दुपार पाळीतील कर्मचारी व अधिकारी यांची गेल्या एकोणीस महिन्यांपासून मोठी गैरसोय होत आहे. सकाळी सहा वाजता येथून बस सेवा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी वर्तमानपत्रे, चहा, अल्पोपाहार आदी मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांनी व पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)