शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एक खिडकी’सह भरारी पथके स्थापन; लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 02:02 IST

आदर्श आचारसंहितेची होणार काटेकोर अंमलबजावणी

- नारायण बडगुजर पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक परवानगी मिळण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ भोसरी येथे सुरू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.निवडणूक काळात गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक विभागाकडून कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच उमेदवार आणि मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. शिरूर मतदारसंघातील भोसरी विभागासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.राजकीय पक्ष आणि संबंधित उमेदवारांनी सभा, मेळावा, रॅली, प्रचाराची वाहने आदींबाबत परवानगी घेणे बंधनकारक आहे. यासाठी भोसरीच्या निवडणूक विभागाच्या कार्यालयात ही ‘एक खिडकी’ सुरू केली आहे. निवडणूक काळात वाहनांचीही कसून तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी भोसरी विभागात महत्त्वाच्या ठिकाणी ‘चेक पोस्ट’ तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (एसएसटी) स्थापन करण्यात आल्या आहेत. एका दिवसाला दोन शिफ्टमध्ये ही टीम काम करेल. एका शिफ्टमध्ये तीन पथके काम करतील. त्यासाठी सहा पथके नियुक्त करण्यात आली आहेत.प्रचार : व्हिडिओ शूटिंगद्वारे वॉच...निवडणूक काळात राजकीय पक्षांच्या सभा, मेळावे, रॅली होतात. त्यात आचारसंहितेचे पालन होत आहे किंवा नाही, तसेच सदरच्या कार्यक्रमासाठी संबंधित उमेदवाराने निवडणूक विभागाकडे नमूद केलेला खर्च आणि प्रत्यक्षात केलेला खर्च यात तफावत आहे का, याची पाहणी आणि पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांचे छायाचित्रण अर्थात व्हिडिओ शूटिंग करण्यात येत आहे. त्यासाठीही पथक नियुक्त करण्यात आले आहे. एक अधिकारी आणि व्हिडिओग्राफर आदींचा यात समावेश आहे.अंमलबजावणीसाठी चार फ्लाइंग स्कॉडआचारसंहितेचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. मात्र त्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई करण्यासाठी फ्लाइंग स्कॉड अर्थात भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. भोसरी विभागात अशी चार पथके राहणार आहेत. निवडणूक विभागाचा उपअभियंता या पथकाचा प्रमुख राहणार आहे. यात एका पोलीस उपनिरीक्षकासह अन्य काही कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी निवडणूक विभाग प्रयत्नशील आहे.- रेश्मा माळी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, भोसरी विभाग

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक