शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

शहरात स्वबळाची तयारी

By admin | Updated: January 24, 2017 02:16 IST

पिंपरी महापालिकेच्या ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी २१ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष

पिंपरी : पिंपरी महापालिकेच्या ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी २१ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष हे चारही मुख्य पक्ष निवडणूक स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत. अनेक दिवसांपासूनच्या युती आणि आघाडीच्या चर्चेचे गु-हाळ थांबण्यास तयार नाही. त्यामुळे सद्यस्थितीत प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आघाडी आणि युतीबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र अंतिम तोडगा अद्यापपर्यंत निघालेला नाही. उमेदवारीअर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात होत असून, अवघे चार दिवस शिल्लक आहेत. तरीही आघाडी आणि युतीबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच आहे. त्यामुळे सगळेच पक्ष स्वतंत्र लढून आपापली ताकत आजमावण्याची शक्यता आहे. चर्चा होत असली, तरी सगळ्याच पक्षांनी स्वबळाचीही तयारी ठेवली आहे. जागांच्या मुद्द्यावर युतीची चर्चा थांबली आहे. युतीबाबत चर्चा सुरू असली, तरी शिवसेनेला कमी जागा देण्याचे धोरण भाजपाने घेतले आहे. सन्मानपूर्वक चर्चा होत नसल्याने शिवसेनेचे स्थानिक नेते नाराज आहेत. चार ते पाच बैठका झाल्या असून, युतीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. समविचारी पक्षांची मतांची विभागणी होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार झाला आहे. मात्र, जागावाटपावर एकमत नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीसाठी आग्रही आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे अधिकार दिले आहेत. मात्र, आघाडी संदर्भात फक्त चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.युती आणि आघाडीची चर्चा होत असताना स्थानिक नेते वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून, ते अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे स्वबळाची तयारीही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाने केली आहे. प्रभागनिहाय उमेदवारांची यादी तयार केली आहे. सर्वच पक्षांच्या उमेदवारांची पहिली फेरीही पूर्ण झालेली आहे. प्रत्येक प्रभागात विविध पक्षांचा इच्छुक उमेदवारांचा गट एकत्रितपणे फिरून मतदानासाठी आवाहन करीत आहेत. तसेच पक्षचिन्ह पोहोचवीत आहेत. त्यामुळे स्वबळाची तयारी केल्याचे दिसून येत आहे. युती-आघाडीचा निर्णय होत नसल्याने कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार अस्वस्थ आहेत. (प्रतिनिधी)‘राष्ट्रवादी’चा फॉर्म्युला काँग्रेसला अमान्य१पिंपरी : विद्यमान नगरसेवक, दुसऱ्या पक्षातून आलेले नगरसेवक आणि मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असणारे ज्या पक्षाची मते असतील त्या पक्षास जागा असतील, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा जागांचा फॉर्म्युला काँग्रेसला अमान्य आहे. उलट काँग्रेसकडून ५० जागांचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आघाडीची चर्चा तात्पुरती थांबली आहे.२पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहे. या निवडणुकीसाठी आघाडी आणि युतीची चर्चा सुरूच आहे. त्यात कोणतीही प्रगती झालेली नाही. काँग्रेसला पिंपरी-चिंचवडमधून हद्दपार करण्याचा मनसुबा ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकीत नरमाईचे धोरण घेतले आहे. ३मोदी लाटेचा फटका बसून एकहाती सत्ता जाऊ नये, यासाठी समविचारी पक्ष म्हणून काँग्रेसला बरोबर घेण्याचे धोरण अवलंबिले आहे. काँग्रेसमध्येही प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर मोठी पडझड झाल्याने राष्ट्रवादीचा आधार घेण्याचे शहर पातळीवरील कार्यकर्ते, नेत्यांचे मत आहे. ४या संदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यात या संदर्भातील दोन बैठका झाल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांनी सकारात्मकता दर्शविली आहे. मात्र, जागांच्या मुद्द्यावर अजून चर्चा झालेली नाही. पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आघाडीबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. ५माध्यमांशी बोलताना त्यांनी फॉर्म्युल्याचेही सूतावोच केले आहे. आमचे विद्यमान नगरसेवक, दुसऱ्या पक्षांतून आमच्या पक्षात आलेले नगरसेवक, तसेच मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले ज्या पक्षांचे मते असतील त्यानुसार जागावाटप करण्यात यावे, असे संकेत दिले आहे.६राष्ट्रवादीतील विद्यमान नगरसेवक ८२, तसेच संलग्न अपक्ष ११ आणि काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले सात नगरसेवक अशी बेरीज केल्यास शंभर जागा होतात. तसेच दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार असा निकष लावल्यास काँग्रेसला किती जागा मिळणार, असा प्रश्न आहे. शंभर जागांवर जर राष्ट्रवादीने दावा केला, तर काँग्रेसला किती जागा मिळणार याची चिंता आहे.