शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

नाती जोपासताना स्वार्थ बाजूला ठेवा

By admin | Updated: March 3, 2016 01:19 IST

स्वार्थी भावनेने नाती जपण्याचा प्रयत्न केल्यास नाती टिकत नाहीत. देव व भक्त, आई-मुलगा अगर मुलगी अशा अनेक निर्मळ नात्यांना एकरूपता येत नाही

देहूरोड : स्वार्थी भावनेने नाती जपण्याचा प्रयत्न केल्यास नाती टिकत नाहीत. देव व भक्त, आई-मुलगा अगर मुलगी अशा अनेक निर्मळ नात्यांना एकरूपता येत नाही, असे प्रतिपादन हभप माऊलीमहाराज कदम यांनी केले.महाशिवरात्री यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र घोरवडेश्वर डोंगराच्या पायथ्याला गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला मंगळवारी वीणा, टाळ व मृदंग पूजनाने सुरुवात झाली. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कीर्तनात माऊलीमहाराज बोलत होते. सप्ताहात काकडारती, गाथा पारायण, महिला मंडळांचे भजन, प्रवचन, कीर्तन व हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम होत असून, पंचक्रोशीतील भाविक कार्यक्रमांचा लाभ घेत आहेत. श्रीक्षेत्र घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठान, अखंड हरिनाम सप्ताह समिती व घोरवडेश्वर प्रासादिक दिंडी आयोजित हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे उद्घाटन जालना येथील कीर्तनकार हभप रामेश्वरमहाराज, हभप यतिराजमहाराज लोहर, हभप नितीनमहाराज काकडे, घोरवडेश्वर दिंडीचे अध्यक्ष हभप मुकुंदमहाराज राऊत, उद्योजक सतीश आगरवाल, चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते वीणा, टाळ, कलश व मृदंगपूजन करून करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब पानमंद, सप्ताह समितीचे अध्यक्ष आनंद गोपाळे, मधुकर बोडके, दत्तात्रय तरस, दत्तोपंत शेलार, बोर्डाचे सदस्य रघुवीर शेलार, विशाल खंडेलवाल, ललित बालघरे, कामगार नेते लहू शेलार आदी उपस्थित होते. मंगळवारी दुपारी गायत्री व माऊली महिला भजनी मंडळाचे भजन झाले. सायंकाळी हरिपाठ संपन्न झाल्यानंतर रात्री नऊला हभप कदम यांचे कीर्तन झाले. कीर्तनाला गायनसाथ हभप लोहरमहाराज, काकडेमहाराज व हभप गणेशमहाराज मोहिते यांनी केली. मृदंगसाथ मृदंगाचार्य हभप विठ्ठलमहाराज गव्हाणे यांनी केली. कदम महाराजांचा सन्मान नंदकुमार काळोखे यांच्या हस्ते करण्यात आला.हभप नानामहाराज तावरे, हभप सुभाषमहाराज गेठे, हभप आसाराममहाराज बढे, हभप नितीनमहाराज काकडे, हभप संतोषमहाराज पठारे यांची कीर्तने होणार असून, येत्या मंगळवारी हभप संतोषमहाराज शेवाळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असल्याचे सप्ताह समितीचे अध्यक्ष आनंद गोपाळे यांनी सांगितले. (वार्ताहर)