शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:साठी माननीयांची ‘सेटिंग’

By admin | Updated: February 17, 2017 05:00 IST

महापालिकेची रणधुमाळी रंगात आली असताना स्वत:ला सेफ करण्यासाठी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही मतदारसंघातील वॉर्डात

पिंपरी : महापालिकेची रणधुमाळी रंगात आली असताना स्वत:ला सेफ करण्यासाठी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही मतदारसंघातील वॉर्डात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांंनी खेळी खेळली आहे. विद्यमान नगरसेवक व माननीयांनी पॅनल चालविण्यापेक्षा विविध पक्षाशी सेटिंग केल्याची चर्चा आहे. महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मनसे अशा विविध पक्षांसह ३२ प्रभागांतून १२८ जागांसाठी ७६८ उमेदवार रिंगणात आहेत. प्रथमच चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग मिनी विधानसभा झालेला आहे. एक प्रभाग किमान ४८ ते कमाल ५९ हजार लोकसंख्येचा झालेला आहे. त्यामुळे मतदारापर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. कोणत्याही पक्षाने १२८ उमेदवार दिलेले नाहीत. अ, ब, क, ड अशा चार जागांवर उमेदवारी देताना राजकीय पक्षांनी काळजी घेतली आहे. शहरपातळीवर भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या स्थानिक नेत्यांनी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघांत उमेदवारी देताना अ‍ॅडजस्टमेंट केली आहे. त्यामुळे मातब्बर नगरसेवक एकमेकांच्या विरोधात आलेले नाहीत. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांशी, भाजपाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे पक्षाची उमेदवारी देताना आपल्या मित्राला त्रास होऊ नये म्हणून दक्षता घेतली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भोसरी विधानसभेत राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार असताना राष्ट्रवादीतील एका गटाने अपक्ष उमेदवाराला मदत केली होती. आता आमदार झाल्यानंतर हेच नेते दुसऱ्या पक्षात गेले. मदत केलेल्या राष्ट्रवादीतील उमेदवारांना त्यांनी अनेक प्रभागांत सेफ केल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)