शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बीजरोपण केंद्र समस्यांनी ग्रासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:45 IST

महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे वर्षभर विद्युतपुरवठा खंडित

कामशेत : जुना मुंबई-पुणे महामार्गालगत कामशेतमधील कृषी विभागाचे तालुका बीजगुणन प्रक्षेत्र खडकाळा येथे आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या खडकाळा बीजगुणन केंद्र विविध समस्यांनी ग्रासले आहे.एक वर्षापेक्षा जास्त काळ महावितरण मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे येथे वीज बंद आहे. त्यामुळे गोळी खत बनवण्याची प्रक्रिया बंद असून, याशिवाय महामार्गाच्या कडेला असलेल्या गटारांमधील सांडपाणी क्षेत्रातील भात शेतीत येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शेतात काम करण्यास मजूर गेले असता त्यांना त्वचेचा आजार होत आहेत. भात रोपवाटिका यांच्यावरही परिणाम होत आहे. याशिवाय रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, चिखल तुडवत अधिकारी व कर्मचाऱ्यांना चालावे लागत आहे.मावळात अलीकडच्या काळात आधुनिक पद्धतीने भातलागवडीचे प्रमाण वाढले आहे. त्याच चारसूत्री, एसआरटी़, श्री पद्धत इत्यादी या आधुनिक पद्धतीने भातलागवड केल्यानंतर त्यांना युरिया ब्रिकेटच्या गोळ्याच्या माध्यमातून योग्य प्रमाणात खत द्यावे लागते. यामुळे युरिया ब्रिकेटच्या गोळी खतास विशेष मागणी असते़ हे खत सर्वत्र उपलब्ध होत नाही. बीजगुणन प्रक्षेत्रात उत्तम दर्जाच्या खतांचे मिश्रण करून गोळी खत तयार केले जाते व तयार केलेल्या खताचा वापर कामशेतमधील बीजगुणन प्रक्षेत्रात लावलेल्या पिकांसाठी व परिसरातील शेतकºयांना शेतीसाठी देण्यात येत होते. मात्र सुमारे एक वर्षापासून विद्युत वितरक कंपनीने बीजगुणन प्रक्षेत्रातील विद्युतपुरवठा खंडित केल्याने यावर्षी येथे खताची निर्मिती न झाल्याने शेतकºयांना गोळीखत उपलब्ध होत नाही.तालुका बीजगुणन प्रक्षेत्र खडकाळा येथे दरवर्षी ४५ ते ५० तन गोळीखत तयार करून त्याचे वितरण केले जाते. पण यावर्षी महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे बीजगुणन प्रक्षेत्राच्या वापरासाठी ११५० किलो गोळी खत बाहेरून आणावे लागले आहे. तर शेतकºयांना तर हे खत तालुक्यात उपलब्धच होत नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. तसेच याठिकाणी अनेक शेतमजूर देखील राहत असून, विजे अभावी त्यांना अंधारात राहावे लागत आहे. विजे अभावी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड