शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

निर्धारानंतरही गटबाजीचे दर्शन

By admin | Updated: January 28, 2017 00:28 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक तयारीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस तालुक्याच्या वतीने येथे आयोजित

वडगाव मावळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक तयारीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस तालुक्याच्या वतीने येथे आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत गटबाजीला संपवण्याचा व पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार केला. परंतु या बैठकीला काही स्थानिक पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने गटबाजीचे दर्शन झाले. गटबाजी संपवण्यासाठी तालुक्यातील ज्येष्ठ नेते सरसावले असताना तालुकाध्यक्ष व इतर नेत्यांनी बैठकीला दांडी मारल्यामुळे गटबाजीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. माऊली दाभाडे, बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, राजाराम राक्षे, अर्चना घारे, माया भेगडे, संतोष भेगडे, गणपत शेडगे, सचिन घोटकुले, तानाजी दाभाडे, अंकुश आंबेकर, बाबूराव वायकर, नारायण ठाकर, विशाल वहिले, अतुल वायकर, वैभव नवघणे, किरण ओसवाल, विशाल दाभाडे, नीलेश दाभाडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकीत फक्त घड्याळ चिन्हाचा विचार करून निवडणुकीला सामोरे जायचे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला बहुमताने निवडून आणून पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावयाचा आहे,असे प्रास्ताविकात माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी सांगितले. माऊली दाभाडे म्हणाले, ‘‘पक्षातील नेते एकत्र नसल्यामुळे कार्यकर्ते व इच्छुक भेदरले असून, त्यांना आता एकत्र येऊन ताकत देण्याची गरज आहे. एकत्र नसल्यामुळे मावळात भाजपा संधी मिळत आहे. ’’ बापू भेगडे म्हणाले, ‘‘गटबाजीमुळे निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ती चूक सुधारण्याची आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याची वेळ आली आहे. ’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी शेडगे यांनी केले. (वार्ताहर)