शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

सुरक्षा रामभरोसे; सोसायटीत सुरक्षा करण्याऐवजी रक्षक गाढ झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:34 IST

वाकड पोलिसांच्या पथकाने ३५० सोसायट्यांत मध्यरात्री केली पाहणी

वाकड : दिवाळीचा सण आणि दिवाळी सुट्या अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने गावाकडे अथवा सहलीला जाणाऱ्या कुटुंबीयांची संख्या मोठी असते. याचाच फायदा घेत चोरटे कार्यरत होतात. बंद सदनिका फोडून ते स्वत:ची ‘दिवाळी’ करतात. हा सर्वांचा अनुभव लक्षात घेता वाकड पोलिसांनी बुधवारी पहाटे अडीच ते चार या वेळेत वाकड परिसरातील सोसायट्यांमध्ये पाहणी करून आढावा घेतला. ज्यांच्या भरवशावर सदनिकाधारक बिनधास्त आणि बिनघोर असतात, असे तब्बल ६० टक्क्यांहून अधिक सोसायट्यांत सुरक्षारक्षक गाढ झोपेत असल्याचे आढळल्याने येथील सोसायट्यांची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याचे वास्तव समोर आले आहे.वाकड पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर ही मोहीम राबविली. वाकड परिसरातील तब्बल ३५० सोसायट्यांमधील सुरक्षा यंत्रणेचा आढावा या वेळी त्यांनी घेतला. त्यावेळी हे धक्कादायक वास्तव समोर आले. याबाबत त्यांच्या असेल त्या अवस्थेतील फोटो काढून ती माहिती संबंधित सोसायटी व सुरक्षारक्षक एजन्सीला कळविण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी पहाटे दोन वाजता वाकड पोलीस ठाण्यातील ७० पोलीस कर्मचारी व पाच अधिकाºयांकडून वाकडमधील सोसायट्यांची यादी व त्यांची माहिती याचे या पूर्वीच संकलन करण्यात आले होते. त्यानुसार तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक हरीष माने यांनी कर्मचाºयांना सूचना देऊन प्रत्येकी दोन कर्मचाºयांची ३५ पथके तयार केली. प्रत्येक पथकाला नियोजनानुसार दहा सोसायट्यांचा आढावा घेण्याचे ठरले. या वेळी पोलिसांनी ३५० सोसायट्यांमध्ये तपासणी केली.रक्षकांनी राहावे सतर्कवाढत्या घरफोड्या, चोºयांना प्रतिबंध घालण्याची सुरक्षारक्षकांचीदेखील जबाबदारी तेवढीच आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी कसे सतर्क राहावे, आणीबाणीच्या काळात काय करावे याबाबत वाकड पोलिसांनी वाकड, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरक्षारक्षक व सोसायट्यांतील पदाधिकाºयांची कार्यशाळा घेतली होती. ही कार्यशाळा होताच त्याच दिवशी पहाटे वाकडमधील एका सोसायटीत चोरीचा प्रयत्न झाला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर सोसायटींमधील सुरक्षारक्षक किती सतर्क आहेत याचा आढावा घेतला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड