शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गुप्त मतदान पद्धतीलाच फासला जातोय हरताळ

By admin | Updated: February 6, 2016 01:31 IST

बोगस मतदानाला आळा घालण्याच्या नावाखाली लोकशाहीतील गुप्त मतदान पद्धतीलाच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत हरताळ फासण्याचे घाटत आहे

पुणे : बोगस मतदानाला आळा घालण्याच्या नावाखाली लोकशाहीतील गुप्त मतदान पद्धतीलाच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत हरताळ फासण्याचे घाटत आहे. तुम्हाला मतदार म्हणून मतदानाचा हक्क बजवायचा असेल तर मतपत्रिकेबरोबरच तुम्हाला स्वत:चे ओळखपत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी हा अजब फतवा काढला आहे. गुप्त मतदान हा कोणत्या संस्थेच्या पारदर्शक कारभारासाठी आवश्यक घटक आहे. अगदी सोसायटीपासून ते लोकसभेपर्यंत हे तत्त्व पाळले जाते. मात्र, साहित्य विश्वातील मातृसंस्था मानल्या जाणाऱ्या साहित्य परिषदेने या नियमाचा भंग केल्याने उमेदवारांसह मतदारांमध्येही टीकेचा सूर उमटत आहे. मतपत्रिका पोस्टात टाकताना मतदारांना ओळखपत्र म्हणून छायाचित्राचा समावेश असलेल्या पॅनकार्ड, आधार कार्ड किंवा वाहन परवाना यासारख्या गोष्टी पुरावा म्हणून सादर कराव्या लागणार आहेत. जे कुणी मतपत्रिकेबरोबर हे पुरावे सादर करणार नाहीत, त्यांची मतपत्रिका बाद केली जाणार आहे. नियम धाब्यावर बसवून निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा अधिकार साहित्य परिषदेला कुणी दिला असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)