शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

महापालिकेची शाळा ठरली अव्वल, शाळेला मिळाले आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:28 IST

महापालिकेचा शाळांचा दर्जा वाढला आहे. अजंठानगर येथील महापालिकेच्या शाळेने राज्य शासनाच्या २४ निकषांची पूर्तता केल्याने आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविले आहे.

पिंपरी : महापालिकेचा शाळांचा दर्जा वाढला आहे. अजंठानगर येथील महापालिकेच्या शाळेने राज्य शासनाच्या २४ निकषांची पूर्तता केल्याने आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या प्राथमिक शाळा ८७ असून, माध्यमिक विद्यालये १९ आहेत. पटसंख्येचा प्रश्न गाजत असताना शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा टक्का वाढत चालला आहे. निगडीच्या अजंठानगर येथील माता रमाबाई आंबेडकर कन्या शाळा आणि माता रमाबाई आंबेडकर मुलांची शाळा या दोन्ही शाळांत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते. शाळांच्या आयएसओ मानांकनासाठी शासनाने निकष निर्धारित केले आहेत. हे निकष पूर्ण करणारी शाळाच आयएसओ गुणांकनासाठी पात्र ठरते. त्यानुसार संबंधित शाळने निकष पूर्ण केले आहेत. त्यामध्ये बोलक्या भिंती, गांडुळखत प्रकल्प, विद्यार्थ्यांसाठी सुविधा, दहा भौतिक सुविधा, गुणवत्तावाढ, विद्यार्थ्यांची उपस्थिती, सौरऊर्जा प्रकल्प, औषधी वनस्पती प्रकल्प, संगणक लॅब, डिजिटल वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वर्गातील फळे, पाणीपुरवठा, स्वच्छता, मुलांना लिहिता-वाचता येणे आदी निकष घातले आहेत. यासह मागच्या तीन वर्षांतील विद्यार्थ्यांची प्रगती, उपस्थिती आणि पटसंख्या, शाळेचे रेकॉर्ड, फायलींची ठेवण आदी निकष तपासले होते. शाळेमध्ये ई-लर्निंग, वाचन संस्कार प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडुळ खत प्रकल्प, पर्यावरण- कुंडी प्रकल्प व औषधी वनस्पतींचे टेरेस गार्डन असे उपक्रम राबविले जातात.मुख्याध्यापिका रजनी सईद म्हणाल्या, ‘‘शाळेमध्ये ४०० मुली व ४०० मुले अशी एकूण ८०० विद्यार्थ्यांची ही शाळा आहे. कन्या शाळेकडे १० शिक्षक कार्यरत आहे. दिवसाआड योगाचे क्लासघेण्यात येतात. राज्य शासनाच्या निकषांची पूर्तता शाळेने केल्याने यश मिळाले आहे.’’मंडळाचे सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंडे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १० कलमी कार्यक्रमात अजंठानगर शाळेने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. अजंठानगर येथील राज्य शासनाच्या निकषांची पूर्तता केली. एकही निकष अपूर्ण असेल, तर शाळेची निवड होत नाही. आज रोजी मनपाच्या तीन शाळांना आयएसओ दर्जा मिळालेला आहे. दिवसेंदिवस सर्वच प्राथमिक शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकडे कल आहे. शहरात महापालिकेच्या अन्य जवळपास २० शाळा आयएसओ मानांकनास पात्र ठरतील.’’