शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाचनालयाने घेतली शाळा दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:54 IST

भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सोहम सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संत तुकारामनगर येथील महापालिकेचे माध्यमिक विद्यालय दत्तक घेण्यात आले आहे.

पिंपरी : भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सोहम सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संत तुकारामनगर येथील महापालिकेचे माध्यमिक विद्यालय दत्तक घेण्यात आले आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. दर तीन महिन्यांनी विद्यार्थ्यांनी काय वाचले, याचा आढावा घेण्यात येणार आहे.या वेळी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक माधुरी रांगणेकर व वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका सुजाता पालांडे, सुलक्षणा शिलवंत उपस्थित होत्या. प्रास्ताविकात जगन्नाथ नेरकर यांनी उपक्रमाची माहिती दिली.सुजाता पालांडे व सुलक्षणा शिलवंत यांनीही विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. गौरव चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. हेमा वैशंपायन यांनी आभार मानले. या वेळी सुधाकर शिंदे, प्रदीप बोरसे व इतर मान्यवर उपस्थित होते. असाच उपक्रम शहरातील इतर ठिकाणी राबविण्यात येणार आहे.सामाजिक संस्थांनी अशा उपक्रमांचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागेल, असा विश्वासही व्यक्त होत आहे.